New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) सर्व पक्षांची लगबग सुरू आहे. बहुतेक मतदारसंघांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून, तिकीट नाकारल्याने विविध पक्षांतील अनेकजण बंडखोरीच्या तयारीत आहेत. भाजपने उत्तर प्रदेशातील पिलिभित मतदारसंघाचे विद्यमान खासदार वरुण गांधी यांचेही तिकीट कापले आहे. ते अपक्ष निवडणूक लढणार असल्याची चर्चा असतानाच काँग्रेसने त्यांना मोठी ऑफर दिली आहे.
भाजपने (BJP) पिलिभित मतदारसंघातून जितीन प्रसाद (Jitin Prasad) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वरुण गांधींचा (Varun Gandhi) पत्ता कट झाल्याने ते आता पुढे काय निर्णय घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यातच काँग्रेसचे (Congress) नेते अधीर रंजन चौधरी यांनी वरुण गांधींना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.
चौधरी म्हणाले, वरुण गांधी यांनी काँग्रेसमध्ये यायला हवे. ते पक्षात आले तर आम्हाला आनंदच होईल. त्यांचा गांधी कुटुंबाशी संबंध असल्याने भाजपने त्यांना तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसमध्ये यावे, असे आम्हाला वाटते. ते ताकदवान नेते आहेत, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वरुण गांधी यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी उमेदवारी यादी जाहीर होण्यापूर्वी आपल्या प्रतिनिधीमार्फत निवडणूक कार्यालयातून चार उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यामुळे आता उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढणार, अशी जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियातून अनेकांनी त्यांना काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजपने नुकत्याच जाहीर केलेल्या उमेदवारी यादीमध्ये सुलतानपूर मतदारसंघातून वरुण यांच्या आई मनेका गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे मुलाचा पत्ता कट करून आईला उमेदवारी जाहीर करत भाजपने वरुण यांची कोंडी केल्याचे बोलले जात आहे.
वरुण यांनी अपक्ष लढण्याचा किंवा अन्य पक्षातून निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा परिणाम मनेका गांधी यांच्या मतदारसंघातही होऊ शकते, अशी चर्चा आहे. एक नकारात्मक संदेश भाजपचे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये जाऊ शकतो, याची भीती वरुण यांनाही असावी. त्यामुळे ते बंडखोरी करणार नाहीत, असाही एक मतप्रवाह आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.