Five State Assembly Elections Result in Marathi : विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. जवळपास निकालाचा ट्रेंड सेट झाला आहे. पुढील काही तासांत निकाल हाती येणार आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मतमोजणीत भाजप विजयी वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. या तीन राज्यांमध्ये भाजपला यश कुणामुळे मिळाले याची आता चर्चा सुरू झाली आहे.
पाच राज्यांच्या या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने कर्नाटकमध्ये केलेली चूक दुरुस्त केली आहे. कर्नाटकमध्ये भाजपने स्थानिक नेतृत्वाला फारसे महत्त्व दिले आहे. याचा फटका निवडणुकीत भाजपला बसला आणि कर्नाटकमधील सत्ता गमवली. पण ही चूक भाजपने या पाच राज्यांच्या निवडणुकीत पुन्हा केली नाही. याची वेळीच जाणीव झाली आणि खेळ भाजपच्या बाजूने झुकला.
पाच राज्यांच्या या विधानसभा निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी यावेळी जोरदार किल्ला लढवला. पंतप्रधान मोदींचे महत्त्व आणि त्यांची मोठी भूमिका कुणीही नाकारू शकत नाही. त्यांची निवडणूक जिंकून देण्याची एकट्याची ताकद होती. पण त्याला आता स्थानिक नेतृत्वाचेही बळ मिळाले. यामुळेच भाजपला मोठे यश मिळताना दिसत आहे. ( Assembly Elections Vote Results 2023 )
मध्य प्रदेशात 'एमपी के मन में मोदी है' आणि राजस्थानमध्ये 'मोदी साथे अपनो राजस्थान' असा नारा भाजपने दिला. पंतप्रधान मोदींनी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 2 ते 27 नोव्हेंबर दरम्यान 42 प्रचार सभा घेतल्या. यापैकी राजस्थानमध्ये 15 सभांसह जयपूर आणि बीकानेरमध्ये रोड शो केले. तर मध्य प्रदेशात 15 प्रचार सभा घेतल्या. छत्तीसगडमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभा झाल्या.
या वर्षाच्या सुरुवातीला कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी जोरदार प्रचार केला. पण निकालात त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. भाजपला कर्नाटकमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. 'नरेंद्र मोदी फॅक्टर'ला मर्यादा आहेत. विधानसभा निवडणुकीत स्थानिक चेहऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते, असे त्यावेळी काँग्रेसने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भाजपने पंतप्रधान मोदींच्या प्रचार सभांसह स्थानिक नेतृत्वालाही संधी दिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपने रणनीती बदलत मुख्यमंत्रीपदाचा चेहराच जाहीर केला नाही. भाजपने स्थानिक नेतृत्वाला संधी दिली. यातून स्थानिक नेत्यांनी आपल्या बळावर जोरदार कामगिरी केली. राजस्थानमध्ये भापजपने वसुंधरा राजे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्यावरही जबाबदारी सोपवली. त्यातून राजस्थानमधील स्थानिक नेत्यांची फळी उभी केली. राजस्थानमधून येणारे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, अर्जुन मेघवाल यांचीही मोठी भूमिका राहिली. ( 2023 Assembly Elections Results in Marathi )
मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे पंतप्रधान मोदींच्या सभा आणि रॅलींमध्ये होते. शिवराजसिंह चौहान यांना शेवटच्या टप्प्यात सक्रिय करून घेतले. सुरुवातीला त्यांचे फोटोही बॅनरवर नव्हते. इथेही भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नाही. तसेच कैलास विजयवर्गीय, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, फग्गन सिंह कुलस्ते, नरोत्तम मिश्रा यांचीही भूमिका महत्त्वाची राहिली. छत्तीसगडमध्येही भाजपने तेच केले. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करताच मोठा प्रचार केला. भाजप प्रदेशाध्यक्ष अरुण साव, मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुतणे आणि भाजप खासदार विजय बघेल, तसेच माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी आपली ताकद निवडणुकीत लावली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.