Congress Latest Marathi News Sarkarnama
देश

पाच वर्षे काम केले तरच तिकीट! काँग्रेसमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांसाठी धोक्याची घंटा

राजस्थान येथील उदयपूरमध्ये शुक्रवारपासून काँग्रेसची तीन दिवसीय 'नव संकल्प चिंतन शिबीर' सुरू झाले आहे.

सरकारनामा ब्युरो

उदयपूर : राजस्थानातील उदयपूरमध्ये शुक्रवारपासून काँग्रेसची तीन दिवसीय 'नव संकल्प चिंतन शिबीर' सुरू झाले आहे. या शिबीरामध्ये अनेक संघटनात्मक बदल केले जाण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपुर्वी पक्षाची बांधणी करण्यासाठी हे बदल अपेक्षित असून अखेरच्या दिवशी त्यावर शिक्कामोर्तब केले जाऊ शकते. (Congress Latest Marathi News)

चिंतन शिबीराला सुरूवात होण्याआधी पक्षाचे नेते अजय माकन यांनी माध्यमांशी संवाद साधत याबाबतची माहिती दिली. माकन म्हणाले, शिबीरानंतर सर्वात जुन्या पक्षात मोठे संघनात्मक बदल पाहायला मिळतील. 'एक परिवार एक तिकीट' हा महत्वाचा प्रस्तावही चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. (Congress Chintan Shivir News)

पाच वर्षांसाठी मिळणार पद

नेत्याच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याला तिकीट हवे असेल तर त्याने पक्षात किमान पाच वर्षे काम केलेले असावे. तसेच पक्षात कोणत्याही पदावर एखादी व्यक्ती जास्तीत जास्त पाच वर्षे राहू शकेल. पुन्हा त्याच पदावर त्यांची नियुक्ती करायची असल्यास तीन वर्षे वाट पाहावी लागेल. हा ठरावही शिबीरा मांडला जाणार आहे.

मंडल समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव

काँग्रेसमधील सर्वात खालचा स्तर हा बूथ समिती असते. ब्लॉक समितीच्या खाली बूथ समित्या येतात. पण आता या दोन्ही समित्यांच्यामध्ये मंडल समिती बनवण्याचा प्रस्ताव आहे. प्रत्येक मंडल समितीमध्ये 15 ते 20 बूथ असतील. याला सर्वांची संमतीही आहे, असं माकन यानी सांगितले.

पदाधिकाऱ्यांच्या कामाचे होणार परीक्षण

पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या किंवा करत असलेल्या कामाच परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी पक्षात असेसमेंट विंग निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. चांगले काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बढती मिळावी आणि काम न करणाऱ्यांना हटविले जावे, यासाठी हा प्रस्ताव असल्याचे माकन यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT