Atal Tunnel Sukhvinder singh sukhu
Atal Tunnel Sukhvinder singh sukhu Sarkarnama
देश

Atal Tunnel News: सुखू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच, भाजपला पहिला दणका!

सरकारनामा ब्यूरो

Atal Tunnel News: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी आता झटपट निर्णय घ्यायला सुरूवात केली आहे.काही दिवसांपूर्वी सुखू यांनी आमदारांसोबत बैठक घेतली होती. एका आमदाराने सुखू यांना सांगितले की, अटल बोगद्याचा फलक आणि त्याची पायाभरणी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती, तो आता काढण्यात आला आहे." यानंतर सखू यांनी पाच दिवसांत अटल बोगद्याचा फलक पुन्हा बसवण्याचे आदेश दिले. या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

सीएम सखू म्हणाले, अटल बोगद्याचा फलक किंवा नाव बदलणार नाही. अटल बोगदा पूर्वी रोहतांग पास म्हणून ओळखला जात होता. भाजपने त्याला अटल बोगदा असे नाव दिले. आम्ही हे नाव बदलणार नाही. अटलजी देशाचे पंतप्रधान होते. आम्ही त्याचा आदर करतो. त्यांची प्रतिष्ठाही आपण जपतो. पण ज्यांनी या बोगद्याची पायाभरणी केली, त्यांची प्रतिष्ठा भाजपच्या लोकांनी जपायला हवी होती.

भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री सखू म्हणाले की, अटल बोगद्याच्या पायाभरणीच्या वेळी सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्षा होत्या. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना तेव्हा हिमाचलमध्ये भाजपचे सरकार होते. प्रेमकुमार धुमल हे भाजपचे मुख्यमंत्री होते. पायाभरणीच्या फलकावर भाजपच्या मुख्यमंत्र्यांचेही नाव आहे. यासाठी चार हजार कोटी रुपयेही मंजूर करण्यात आले होते. मात्र उद्घाटनाच्या वेळी केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार नव्हते. त्यामुळे पायाभरणीचा फलक काढून कुठेतरी लपवून ठेवण्यात आला. मात्र आता आम्ही तिथे पुन्हा पायाभरणीचा फलक उभारणार आहोत.

सीएम सखू यांनी अटल बोगद्याचे नाव बदलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ पायाभरणीचा फलक पुन्हा बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजपने सखू यांच्या या निर्णयाला विरोध केला आहे. त्यामुळे आता हिमाचल मध्ये भाजप - काँग्रेसमध्ये अटल बोगद्यातच्या श्रेयावरून जोरदार जुंपली आहे. भाजपसाठी आता हा एक धक्का मानण्यात येतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT