Atiq Ahmed Murder : Atiq Ahamed Wife Shahista Surender  Sarkarnama
देश

Atiq Ahmed Murder : दफनविधीपूर्वी शाईस्ताला पाहायचाय अतिक-अशरफचा चेहरा? आत्मसमर्पणाची तयारी?

Atiq Ahamed Wife Shahista Surender : अतिकच्या पत्नीच्या शोधासाठी ५० हजार रूपयांचे बक्षीस..

सरकारनामा ब्यूरो

Atiq Ahamed Wife Shahista Surender : अतिक अहमद आणि अशरफ यांच्या पोलिसांच्या उपस्थितीतच खून झाल्यानंतर, आता त्यांच्या मृतदेहाची दफनविधी करण्यासाठी कार्यवाही होणार आहे. मात्र या दरम्यान शाईस्ता आत्मसमर्पन करण्याची शक्यता आहे. अतिकची पत्नी शाइस्ता ही उमेश पाल खून प्रकरणी फरारी आरोपी आहे. शाईस्तावर ५० हजार रूपयांचे बक्षीसही जाहीर केली आहे. (uttar pradesh atiq ahmed and his brother ashraf ahmed shot dead in prayagraj)

सूत्रांकडून असे सांगण्यात येत आहे की, पती आणि दिर यांचा खून झाल्यानंतर शाईस्ताला दफनविधी करण्यापूर्वी त्यांचा चेहरा पाहायचा आहे. यासाठी शाईस्ताला शरण यायचे आहे. शाईस्ताच्या आत्मसमर्पणाच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज पोलिसांनी सीजेएम न्यायालयात मोठा फौजफाटा लावला आहे.

न्यायालय आणि परिसरात शांतता राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांच्या हत्येनंतर शाइस्ता परवीन फरार आहे. पोलिसांनी शाईस्तावर 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. 13 एप्रिल रोजी मुलगा असदच्या एन्काउंटरनंतरही शाइस्ता पुढे आली नव्हती. मात्र शनिवारी कोल्विन हॉस्पिटलच्या आवारात पती अतिक आणि दीर अश्रफ यांची हत्या केल्यानंतर शाईस्ताने आत्मसमर्पण करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अतिक-अश्रफ यांच्या खून्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी :

दरम्यान, अतिक आणि अशरफच्या खून्यांना न्यायालयात हजर करण्याची तयारी सुरू आहे. शनिवारी रात्री उशिरा अतिक आणि अश्रफ यांचा खून झाल्यानंतर तिन्ही मारेकऱ्यांची चौकशी सुरू होती. प्राप्त माहितीनुसार, मारेकऱ्यांनी मोठा डॉन बनण्यासाठी ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांना सांगितले आहे.

अतिक-अश्रफ यांच्या मृतदेहाचे एक्स-रे काढण्यात आले :

दुसरीकडे, पोस्टमॉर्टमपूर्वी अतिक आणि अश्रफ यांचे एक्स-रे करण्यात आले आहेत. शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह थेट स्मशानभूमीत नेण्यात येणार असून, असदच्या कबरीजवळ दोन्ही मृतदेहांना दफन करण्यात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT