Dushyant Chautala and Chandrashekhar Ravan Sarkarnama
देश

Dushyant Chautala - Chandrashekhar Ravan : हरियाणात दुष्यंत चौटाला अन् चंद्रशेखर रावण यांच्या वाहन ताफ्यावर हल्ला!

Haryana Assembly Election : या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वातावरण तणावपूर्ण झाले होते ; दुष्यंत चौटांलांची पोलिसांसोबत बाचाबाचीही झाली.

Mayur Ratnaparkhe

Attack on the car of Dushyant Chautala and Chandrashekhar Ravan : हरिणात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. अशात आता हरियाणमधील जींद जिल्ह्यातील उचाना विधानसभा क्षेत्रात सोमववारी रात्री निवडणूक प्रचारादरम्यान माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि उत्तर प्रदेशचे खासदार चंद्रशेखर रावण यांच्या वाहनावर अज्ञातांकडून हल्ला झाला. यामुळे एकच खळबळ उडाली असून, वातावरण तणावपूर्ण झाले होते.

वाहनावर हल्ला करणाऱ्यांनी गोंधळ निर्माण करत गाडीवर दगडफेक केली आणि लक्ष विचलीत करण्यासाठी धूळ-मातीही उडवली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दुष्यंत चौटाला आणि पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्या घटनेमुळे बराचवेळ गोंधळ सुरू होता.

उचाना मतदारसंघात दुष्यंत चौटाला यांच्या 'जेजेपी'चे उमेदवार आहे आणि खासदार चंद्रशेखऱ रावण हे त्या उमेदवाराच्या प्रचारार्थ रोड शो करण्यासाठी आले होते. जेव्हा रात्री उशीरी त्यांचा वाहन ताफ उचनामधील कलां गावांत पोहचला, तेव्हा अचानक काही तरुणांकडून वाहनांवर दगडफेक झाली. ज्यामुळे चंद्रशेखर यांच्या वाहनाची काचही फुटली.

यानंतर घटनास्थळी पोलिस दाखले झाले तेव्हा तिथे वाद निर्माण झाला अखेर अतिरिक्त पोलिस दलास पाचारण करावे लागले. रोड शो देखील थांबवला गेला. दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर रावण हे कार्यकर्त्यांसोबत थांबले. घटनेची माहिती मिळताच गर्दी वाढू लागली. यानंतर दुष्यंत चौटाला यांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांना तासभराची मुदत दिल्याने, पोलिस आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. अखेर चौटाला आणि चंद्रशेखर रावन हे तिथून दुसऱ्या वाहनाने निघून गेले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT