JJP-ASP Alliance : हरियाणा विधानसभेसाठी 'जेजेपी' - 'आजाद समाज पार्टी'ची आघाडी ; जागा वाटप जाहीर!

Dushyant Chautala and Chandrasekhar Azad : दुष्यंत चौटाला यांनी केली घोषणा ; तर जाणून घ्या चंद्रशेखर आजाद यांनी काय म्हटलं आहे?
Dushyant Chautala and Chandrasekhar Azad
Dushyant Chautala and Chandrasekhar AzadSarkarnama
Published on
Updated on

Haryana Assembly Elections : हरियाणा विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जननायक पार्टीचे दुष्यंत चौटाल आणि आजाद समाज पार्टीचे चंद्रशेखर आजाद यांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशनल क्लबमध्ये त्यांनी संयुक्तरित्या पत्रकारपरिषदही घेतली. दोन्ही पक्षांनी सांगितले आहे की, ते यंदा मजबूतीने निवडणूक लढवणार आहेत.

पत्रकारपरिषदेत म्हटले गेले आहे की, ही घोषणा भलेही आज झाली असेल, परंतु याची चर्चा खूप आधीपासून होत आहे. त्यांनी सांगितले की, आम्ही 36 समुदायांसोबत मिळून काम करू. आम्ही शेतकरी, तरूण, महिलांचा आवाज बनून निवडणूक लढवणार आहोत.

Dushyant Chautala and Chandrasekhar Azad
NDA Government : मोदी सरकारला आज राज्यसभेतही मिळाले बहुमत; कसा घडला हा चमत्कार?

दुष्यंत चौटाला(Dushyant Chautala) यांनी म्हटले की, यंदा आम्ही हरियाणामध्ये एकत्रितपणे 90 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. 70 जागांवर जेजेपी निवडणूक लढणार आहे आणि अन्य 20 जागांवर आजाद समाज पार्टी निवडणूक लढवत आहे.

Dushyant Chautala and Chandrasekhar Azad
Assam Rajya Sabha By-Election : आसाममधील राज्यसभेच्या दोन्ही जागांवर भाजपच्या उमेदवारांचा बिनविरोध विजय!

आज समाज पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार चंद्रशेखर आजाद(Chandrasekhar Azad) यांनी म्हटले की, आम्ही हरियाणामध्य तरुण आणि गरिबांचा आवाज बनून निवडणूक लढवणार आहोत. आम्ही 36 समुदायांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार आहोत. त्यांनी हेही सांगितले की, ही आघाडी शेतकऱ्यांसाठी अतिशय खास आहे. आमचा प्रयत्न राहील की, शेतकऱ्यांना त्यांचा हक्क कसा दिला जाईल. चंद्रशेखर यांनी सांगितले की, जेव्हा कधी शेतकऱ्यांचा मुद्दा समोर आला तेव्हा दुष्यंत चौटाला यांचा परिवार नेहमीच सोबत उभा होता. आम्हाला हरियाणाची उन्नती हवी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com