Awadhesh Prasad, Akhilesh Yadav Sarkarnama
देश

Assembly Election : अयोध्येत विजय मिळवणारे अवधेश प्रसाद भाजपला पुन्हा धूळ चारणार; अखिलेश यांची रणनीती...

Rajanand More

Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांनी अयोध्येत भाजपचा पराभव केला. त्यानंतर समाजवादी पक्षात प्रसाद यांचे वजन वाढले. इंडिया आघाडीतही त्यांना मान मिळू लागला. आता पुन्हा भाजपला धूळ चारण्यासाठी सपचे प्रमुख अखिलेश यादव यांनी प्रसाद यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकल्याचे समजते.

उत्तर प्रदेशात पुढील काही दिवसांत दहा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी उमेदवार निश्चित केले जात आहे. या दहा मतदारसंघांमध्ये मिल्कीपूर ही महत्वाची जागा मानली जात आहे. लोकसभेत जाण्यापूर्वी अवधेश प्रसाद याच मतदारसंघाचे आमदार होते. त्यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली आहे.

मिल्कीपूर मतदारसंघातून अखिलेश यांनी अवधेश प्रसाद यांचे पुत्र अजित प्रसाद यांना तिकीट दिल्याची चर्चा आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. रविवारी पक्षाच्या कार्यालयात अजित प्रसाद यांच्यासह इतर इच्छुकांना सन्मानित करण्यात आले.

अयोध्येत राम मंदिर उभारल्यानंतर लगेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यामुळे मिल्कीपूर मतदारसंघातील निवडणूकही समाजवादी पक्षाकडून प्रतिष्ठेची केली जाणार आहे. त्यासाठी अजित प्रसाद म्हणजेच एकप्रकारे अवेधश प्रसाद यांचीच परीक्षा असल्याचे मानले जात आहे. प्रसाद यांना पुन्हा एकदा भाजपला धूळ चालत आपली ताकद दाखवून द्यावी लागणार आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात कटेहरी, करहल, मिल्कीपूर, मीरापूर, गाझियाबाद, मझवां, शीशमऊ, खैर, फूलपूर, कुंदरकी या मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यातील नऊ मतदारसंघ हे लोकसभा निवडणुकीत आमदारांचा विजय झाल्यामुळे रिक्त झालेल्या आहेत. तर शीशमऊ मतदारसंघाचे आमदार इरफान सोलंकी यांना शिक्षा झाल्याने आमदारकी रद्द झाली आहे. निवडणूक आयोगाकडून अद्याप पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT