Ram Mandir Crores Scam Sarkarnama
देश

Ayodhya Ram Mandir: श्रीराम मंदिरातील दानचोरी प्रकरणात नवा ट्विस्ट : चंपत राय यांनी राजीनामा दिला पण एका नियमामुळे पुन्हा होऊ शकते एन्ट्री

Ayodhya Ram Mandir Donation Theft, Yogi Government, Ram Janmabhoomi Trust: अयोध्येतील राम मंदिर दानचोरी प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईची तयारी सुरू असून, श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या बैठकीत चंपत राय व अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ayodhya Ram Mandir Donation Theft: मागील काही दिवसांपासुन अयोध्येतील श्रीराम मंदिरातील दानचोरी प्रकरण चर्चेत आहे. राम मंदिर संकुलातील एका टॉयलेटमध्ये नाण्यांनी भरलेली एक पिशवी सापडली होती. ज्यामध्ये २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. यानंतर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ही चोरी उघडकीस आली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलीसांनी कारवाई करत अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, तिन्नू यादव, मनीष यादव यांच्यासह ८ जणांना अटक केली होती. यानंतर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला होता.

आता या आरोपांच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी ट्रस्टची पहिली बैठक ६ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. नियमांनुसार, कोणताही राजीनामा स्वीकारण्यासाठी किंवा अधिकाऱ्याला पदावरून हटवण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते. जर त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला, तर ते प्रशासकीय पदावरून दूर होतील, परंतु कायदेशीररित्या ट्रस्टचे सदस्य राहू शकतात.

दानचोरी प्रकरणी चंपत राय आणि मिश्रा यांची चौकशी झाली आहे. यासंदर्भात ट्रस्टची बैठक सोमवारी (ता. ६) होण्याची शक्यता आहे. या बैठकीत राय आणि अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, ट्रस्टच्या उपनियमानुसार राजीनामा स्वीकारण्यासाठी दोन-तृतीयांश बहुमत असणे अनिवार्य आहे. राजीनाम्याबाबतचा अंतिम निर्णय ट्रस्टच्या नियमांनुसारच घेतला जाणार आहे. ट्रस्टचे सदस्य मतदानाद्वारे राजीनामा स्वीकारू शकतात.

आरोपींवर बुलडोझर कारवाईची तयारी

राम मंदिरातील दानचोरी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींविरुद्ध उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या अवैध मालमत्तांवर बुलडोझर कारवाई करण्याची तयारी चालविली आहे. त्यांच्यावर उत्तर प्रदेश गुंड आणि समाजविघातक कृत्ये (प्रतिबंध) कायद्यांतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT