Ram Temple Donation Theft : बाथरूममध्ये नोटांची बंडले लपवून नंतर करायचे गायब; राम मंदिराच्या देणगीवर डल्ला मारणारे 8 जण कोण?

Who Are the Eight Accused in the Ram Mandir Donation Scam? अयोध्येतील राम मंदिरातील जमा झालेल्या देणगीमध्ये अपहार केल्याप्रकरणी 8 संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir Sarkarnama
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir Donation Theft : अयोध्येतील राम मंदिरात भाविकांकडून जमा झालेल्या देणगीमध्ये अपहार प्रकरणात अखेर आठ जणांना अटक करण्यात आली आहे. मंदिरातील CCTV मध्ये संशितांकडून पैशांची अफरातफर करतानाचे चित्रण आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अविनाश शुक्ला, अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, मनीष कुमार यादव, करुणेश पांडे, रामशंकर मिश्रा, सुभाष श्रीवास्तव आणि रामशंकर यादव ऊर्फ टिन्नू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सर्व आठही संशयितांना २९ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान आतापर्यंत ७९.८५ लाख रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली.

राम मंदिरातील देणगीमध्ये अपहार झाल्याच्या आरोपानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारत श्री राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय व विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिला आहे.

राम मंदिरातील देणगीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याची चर्चा काही दिवसांपासून होत होती. विरोधी पक्षांकडूनही या प्रश्नावर सरकारला जाब विचारला जात होता. यामध्ये ७ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला होता. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य कृष्ण मोहन यांनी याबाबत तक्रार दिली होती.

Ayodhya Ram Mandir
Ram Mandir SIT Investigation : राम मंदिर देणगी अपहार प्रकरण तापलं; CCTV बंद करून कोट्यवधींची चोरी, भाजपवर अखिलेश यादवांचा हल्लाबोल

त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने १४ जून रोजी तीन सदस्यांच्या विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली होती. SIT च्या प्राथमिक अहवालातील शिफारशींनंतर आठ जणांवर काल गुन्हा दाखल करण्यात आला. रोख रक्कम मोजण्याची जबाबदारी असलेल्या सहा कर्मचाऱ्यांसह एकूण आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे.

आठही संशयित आरोपींची पोलिसांनी अद्याप कोठडी मागितलेली नाही. सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यावेळी पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते.

चोरी करताना CCTV झाकण्याचे प्रयत्न

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, अटकेतील पाच ते सहा जण बँकेचे कर्मचारी होते. त्यांना मंदिरातील दान रक्कम मोजण्याच्या कामावर नियुक्त करण्यात आलं होतं. मंदिरातल्या बाथरूममध्ये नोटांची बंडले लपवून नंतर ते गायब करायचे.

पैसे मोजण्यापूर्वी एका कर्मचाऱ्याकडून CCTV कॅमेऱ्यावर काहीतरी कापड टाकून किंवा तात्पुरते तेथील दृश्य कॅमेऱ्यामध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात. त्यानंतर इतर कर्मचारी देणगी पेट्यांमधील नोटांचे बंडल कपड्यांमध्ये किंवा खिशात लपवत असत. ही रोकड मंदिर परिसरातील शौचालयात आधीच तयार करून ठेवलेल्या ठिकाणी लपवून ठेवली जात असे. कामाचा दिवस संपल्यानंतर किंवा कोणाला संशय येणार नाही याची खात्री पटल्यानंतर रक्कम, बाहेर नेली जात होती. काही CCTV फुटेजमध्ये ही चोरी कैद झाल्याने पितळ उघड पडलं.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir Donation Scam : राम मंदिरात मोठा घोटाळा? दान चोरी प्रकरणात 40 कर्मचारी हटवले; योगी सरकारकडे SIT चा 150 पानी अहवाल

ते ८ संशयित आरोपी कोण?

१. रामशंकर यादव ऊर्फ टिन्नू

रामशंकर यादव हे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचे अंत्यत निकटवर्तीय मानले जात होते. मंदिरातील विविध व्यवस्थांमध्ये त्यांचा हस्तक्षेप असल्याचे सांगितले जाते. दान मोजणी प्रक्रियेवर देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मोजणी कक्षाची चावीही त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणातील ते प्रमुख संशियत मानले जात आहेत.

२. अनुकल्प मिश्रा

अनिल मिश्रा यांचे नातेवाईक असून लवकुश मिश्रा यांचे मेहुणे आहेत. दान मोजणीचे काम त्यांच्याकडे होते. त्यांच्या घरातून कथितरीत्या चोरीची रक्कम जप्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

३. लवकुश मिश्रा :

अनिल मिश्रा यांचे नातेवाईक आणि अनुकल्प मिश्रा यांचे मेव्हणे आहेत. तेही दान मोजणी प्रक्रियेत सहभागी होते. त्यांच्या घरातूनही कथितरीत्या चोरीची रक्कम जप्त झाल्याचे सांगितले जात आहे.

४. मनीष यादव :

टिन्नू यादव यांचे पुतणे आहेत. ते मोजणी प्रक्रियेत सहभागी होते. त्यांच्याकडूनही कथितरीत्या चोरीची रक्कम जप्त झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

५. अविनाश शुक्ला

तेही चढावा मोजणीच्या कामात कार्यरत होते. त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख रुपये आढळल्याची चर्चा होती.

६. सुभाष श्रीवास्तव :

दान मोजणीचे प्रभारी होते. संपूर्ण मोजणी प्रक्रिया त्यांच्या देखरेखीखाली पार पडत होती.

७. करुणेश पांडेय

अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांच्यासोबत कटात सहभागी असल्याचा आरोप आहे.

८. रमाशंकर मिश्रा

अनुकल्प मिश्रा आणि लवकुश मिश्रा यांच्यासोबत कटात सहभागी असल्याचा आरोप आहे.

दरम्यान या आठ जणांना अटक करुन बड्या आरोपींना संरक्षण देण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी ट्रस्टवर केला आहे. (Crime News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com