Ayodhya Ram Mandir News : Sarkarnama
देश

Ayodhya Ram Mandir News : राम मंदिराबाबत मोठी घोषणा; श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेची तारीख जाहीर!

Ayodhya Ram Mandir News Update : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तीन ते चार महिनेच्या कालावधी आधी श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ayodhya Ram Mandir News Update : अयोध्येतील राम मंदीराच्या प्राणप्रतिष्ठापनेची तारखा जाहीर झालेल्या आहेत. १५ ते २४ जानेवारी २०२४ दरम्याम श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाईल. शेवटच्या दिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रण दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तीन ते चार महिनेच्या कालावधी आधी श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. (Latest Marathi News)

आज अधिकृतपणे श्री राम मूर्तींची प्राणप्रतिष्ठापणेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आता पर्यंत राम मंदिराचं बहुतांशी काम झालेले आहे. रामभक्तांना याची प्रतीक्षा होती. आता याची तारीख आज अखेर जाहीर झाली आहे.

राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "प्राणप्रतिष्ठेच्या अखेरच्या दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले जाणार आहे. तसेच प्राणप्रतिष्ठापणा यानंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जाणार आहे. २४ - २५ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे, असे ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT