Bawankule On Uddhav Thackeray: 'एक हजार टक्के सांगतो आता उद्धव ठाकरेंबरोबर युती नाही'; बावनकुळेंनी स्पष्टं सांगितलं

'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.
 Uddhav Thackeray on Devendra Fadanvis
Uddhav Thackeray on Devendra Fadanvis Sarkarnama
Published on
Updated on

Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : एक हजार टक्के सांगतो यापुढे उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार नाहीत. असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा दावा केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर आणि भाजप- ठाकरे गटात सुरु असलेल्या टिका टिपण्ण्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि भाजपमधील कटूता संजय राऊत यांच्यामुळे निर्माण झाल्याचं बोललं जातं. जर संजय राऊतांना बाजूला केलं तर उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का या प्रश्नावर बोलाताना ते म्हणाले, 'ज्या पद्धतीने देवेंद्रजींच्या (Devendra Fadanvis) पाठीत खंजीर खूपसून आपली विचारधारा सोडून काँग्रेस- राष्ट्रवादीची विचारधारा मान्य केली. ते पाहता उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा एकत्र येणं शक्य नाही.''

 Uddhav Thackeray on Devendra Fadanvis
Devendra Fadnavis News : '..अर्धवटराव, स्क्रिप्ट रायटर बदला' ; फडणवीसांचा ठाकरेंवर खोचक निशाणा !

भाजपला राज्यात २०१९ च्या लोकसभेप्रमाणे यश मिळवायचं असेल तर सोबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असायला हवेत. अशी विचारधारा भाजपात आहे का. या प्रश्नावर बोलताना बावनकुळे म्हणाले, ''अशा कुठल्याही प्रकारची चर्चा किंवा विचारधारा पक्षात नाही. मी आपल्याला एक हजार टक्के सांगतो अशी कोणाचीही विचारधारा नाही. असा विचार कोणाच्याही मनात नाही आणि येणारही नाही.'' अशा स्पष्ट शब्दातं त्यांनी भूमिका मांडली आहे.

''राज्यात २०१९ पर्यंत सलोख्याचे वातावरण होते. काँग्रेस राष्ट्रवादीशी तेव्हा भाजप शिवसेनेचे चांगले संबंध होते.देवेंद्रजी आले, त्यांनी कधीही आकसाचे राजकारण झालं नाही. पण २०१९ नंतर जी कटूता आली, मनभेद झाले, मतभेद होऊ शकतात पण इथे मनभेदही झाले. ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेने फडणवीसांना समर्थन दिले. फडणवीसांना जनतेने मान्य केलं होतं. पण त्यांना दगा देऊन उद्धव ठाकरे सोडून गेले.'' असंही त्यांनी यावेळी सांगितलं. (Maharashtra Politics)

 Uddhav Thackeray on Devendra Fadanvis
Thackeray Vs Shinde Group : खोके अन् गद्दार दिनाला स्वाभिमान दिनाने उत्तर; ठाकरे-शिंदे गटात आजही रंगणार कलगीतुरा

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की, ज्या दिवशी आम्हाला किंवा आमच्या पक्षाला काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल तेव्हा मी आमचा पक्ष बंद करुन टाकेल. पण उद्धवजींनी सत्तेत राहण्यासाठी आणि मुख्यमंत्री बनण्यासाठी, आपला मुलगा मंत्री होण्यासाठी त्यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीचे विचार स्वीकारुन वेगळी संस्कृती निर्माण केली. त्यातून कटूता निर्माण झाली. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आमच्याशी खूप वाईट वागले. इथपर्यंत की त्यांनी देवेंद्रजींना जेलमध्ये टाकण्याचा त्यांनी बी प्लॅन केला होता. महाराष्ट्रात भाजपच्या अनेक नेत्यांने जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. शेवटी आरपारची लढाई झाली.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com