Tej Pratap Yadav Sarkarnama
देश

Ram Mandir : तेजप्रताप यादव यांच्या स्वप्नात श्रीराम आले अन् म्हणाले, 22 जानेवारीला...

Tej Pratap Yadav : अयोध्येतील राम मंदिरावरून राजकारण तापलं...

Rajanand More

Bihar News : बिहार सरकारमधील मंत्री तेजप्रताप यादव आणि वादग्रस्त वक्तव्य हे समीकरणच आहे. सध्या देशात अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावरून राजकारण तापलं आहे. इंडिया आघाडीतील नेत्यांनी हा सोहळ्याचा भाजपने राजकीय इव्हेंट केल्याचा आरोप केला आहे. चार शंकराचार्यही अयोध्येला जाणार नसल्याचा दाखलाही विरोधकांकडून दिला जात आहे. त्यातच यादव यांचे वक्तव्य सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यादव (LaluPrasad Yadav) यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) यांचे बंधू असलेले तेजप्रताप यादव (Tejpratap Yadav) सध्या पर्यावरणमंत्री आहेत. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या स्वप्नात श्रीराम आल्याचे सांगितले. अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) २२ जानेवारीला होणारा सोहळा हे सगळं ढोंग असून त्या कार्यक्रमाला ते येणार नाहीत, असे श्रीरामांनी स्वप्नात सांगितल्याचा दावा यादव यांनी केला आहे.

यादव म्हणाले, ‘निवडणूक (Election) झाले की श्रीरामाला विसरले जाईल. 22 जानेवारीला त्यांनी आलेच पाहिजे, हे बंधनकारक आहे का? श्रीराम हे चार शंकराचार्यांच्या स्वप्नात आले. माझ्याही स्वप्नात आले आणि म्हणाले की, तिथे ढोंग सुरू आहे, मी येणार नाही.’ शंकराचार्य अयोध्येला जाणार नसल्याची आठवण यादव यांनी यावेळी करून दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, चारही शंकराचार्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. दोन शंकराचार्यांनी या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत, तर दोघांनी कडाडून विरोध केला आहे. मंदिराचे काम पूर्ण झालेले नाही, त्याआधीच हा सोहळा होत आहे. धार्मिक संस्कृतीला हे धरून नसल्याचे या शंकराचार्यांनी म्हटले आहे.

काँग्रेससह इंडिया आघाडीतील काही पक्षांनीही सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने या सोहळ्याचा राजकीय इव्हेंट केल्याची टीका विरोधकांनी केली आहे. केवळ निवडणुकीसाठी 22 जानेवारी ही तारीख निश्चित केल्याचा दावा केला जात आहे. भाजपकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.

R...  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT