Maldives Vs India : चीनमधून परतताच मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारताला दिली डेडलाईन; संघर्ष वाढणार?

Mohammad Muizzu : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू होते चीन दौऱयावर...
Maldives Vs India
Maldives Vs IndiaSarkarnama

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपला भेट दिली आणि मालदीव विरूध्द भारत असा संघर्ष सुरू झाला. मालदीवच्या मंत्र्यांनी मोदींविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यावरून भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच मालदीवच्या पर्यटनालाही मोठा झटका बसला. त्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुईज्जू यांनी चीनचा दौरा केला. तिथून परतताच मुईज्जू यांनी भारतावर डोळे वटारले आहेत.

मालदीवमध्ये (Maldives) भारतीय लष्कराची (Indian Army) एक तुकडी 2013 पासून तैनात आहे. मालदीवच्या मागील सरकारच्या विनंतीनंतर सरकारने ही तुकडी तैनात केली होती. समुद्री सुरक्षा आणि आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी मागील सरकारने ही विनंती केली होती. आता ही तुकडी 15 मार्चपर्यंत परत बोलवा, असे मुईज्जू यांनी म्हटले आहे. त्यांनी भारताला (India) दिलेल्या डेडलाईनमुळे संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

Maldives Vs India
Congress : काँग्रेसला डबल झटका; देवरांआधी मोठ्या नेत्यानं दिला पदाचा राजीनामा

मुईज्जू हे शनिवारीच चीनमधून पाच दिवसांचा दौरा आटोपून मालदीवमध्ये परतले आहेत. त्यांनी मालदीवमध्ये पाऊल ठेवताच म्हटले होते की, ‘आमचा देश छोटा असला तरी आमच्यावर दादागिरी करण्याचा लायसन्स कुणाजवळ नाही.’ त्यांनी यावेळी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख भारताकडे होतो, असे मानले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

चीनचे समर्थक असलेले मुईज्जू यांनी चीन दौऱ्यात राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली होती. मोदींवर तेथील मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतरच हा दौरा झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. दोन्ही देशांमधील राजकीय वाद वाढला आहे. आता त्यांनी भारतीय सैनिकांची तुकडी परत माघारी घेण्यास सांगितल्याने त्यात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

मुईज्जू यांनी आपल्या निवडणूक घोषणापत्रामध्ये 75 सैनिकांचा समावेश असलेली तुकडी हटविण्याची घोषणा केली होती. यावर दोन्ही देशांचा एक गटही स्थापन करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी आता 15 मार्चची मुदत भारताला दिली आहे. यावर आता भारताकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maldives Vs India
Rahul Gandhi : मी वीस वर्षे राजकारणात, पहिल्यांदाच अशा ठिकाणी आलो जिथे..! राहुल गांधी झाले भावूक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com