Baba Bageshwar Sarkarnama
देश

Baba Bageshwar News : 'वंदे मातरम् म्हणण्यात अडचण असणाऱ्यांनी..' ; बाबा बागेश्वर यांचं मोठं विधान!

Baba Bageshwar On Vande Mataram : जाणून घ्या, नेमकं कुठे आणि काय म्हणाले आहेत? तरूणांनाही केलं आहे विशेष आवाहन

Mayur Ratnaparkhe

Baba Bageshwar Dhirendrakrishna Shastri News बाबा बागेश्वर नावाने प्रसिद्ध असलेले पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी गुरुवारी म्हटले की, ज्यांना वंदे मातरम् म्हणण्यात अडचण वाटेत, त्यांनी तत्काळ हा देश सोडला पाहीजे. स्वातंत्र्यदिन निमित्त मध्य प्रदेशातील छतपूर जिल्ह्यातील राजनगर येथील आपल्या शाळेत पोहचलेल्या धीरेंद्र शास्त्री यांनी तिथे ध्वजारोहण केले.

याप्रसंगी त्यांनी म्हटले की, ''हर घर तिरंगा अभियान देशासाठी खूप आवश्यक आहे आणि आम्ही याचे समर्थनही करतो. मात्र काहीजण असेही आहेत ज्यांना वंदे मातरम् म्हणण्यात अडचण वाटते, त्यांनी हा देश सोडला पाहिजे.''

मीडियाशी बोलताना बाबा बागेश्वर(Baba Bageshwar) म्हणाले की, येथे येऊन त्यांना खूप छान वाटत आहे. कारण, ज्या शाळेत शिक्षण घेतलं त्याच ठिकाणी आज ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी हेही सांगितले की, शाळेत येऊन त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

याचबरोबर देशातील युवकांना आवाहन करत त्यांनी म्हटले की, हे महत्त्वाचं नाही की तुम्ही कुठं शिकलात, परंतु तुमचे विचार कसे आहेत हे महत्त्वाचं असतं. जर तुमचे विचार चांगले असतील तर नक्कीच तुम्ही देशासाठी काहीतरी चांगलं करू शकाल. माझ्यासाठी यापेक्षा मोठा सन्मान काय असेल, जिथे शिकलो तिथेच आज आलो आहे. काहीतर असं करा की एक दिवस तुम्हालाही तुमच्या शाळेत ध्वजारोहण करण्याची संधी मिळेल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT