Narendra Modi, Mohan Bhagwat
Narendra Modi, Mohan BhagwatSarkarnama

Bangladesh Crisis : बांगलादेशातील हिंदूंची मोदी, भागवतांना चिंता; सुरक्षेबाबत म्हणाले...

Narendra Modi Mohan Bhagwat Independence Day Hindu : बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेक हिंदू कुटुंबावर हल्ले करण्यात आले आहे. मंदिरांचीही नासधूस करण्यात आली आहे.
Published on

New Delhi : देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण देताना बांगलादेशातील हिंदूविषयी चिंता व्यक्त केली आहे. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनीही हिंदूच्या सुरक्षेची जबाबदारी भारताची असल्याचे विधान केले आहे.

मागील काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये विद्यार्थी आंदोलन पेटले आहे. देशात मोठा हिंसाचार झाला. यादरम्यान हिंदूंच्या घरांवर आणि मंदिरांवरही हल्ले करण्यात आले. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान मोदी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही त्याचा उल्लेख केला.

Narendra Modi, Mohan Bhagwat
Rahul Gandhi : विरोधी पक्षनेते 10 वर्षांनंतर पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर; राहुल गांधींच्या जागेवरून वादाची ठिणगी

पंतप्रधान मोदी म्हणाले, ’बांगलादेशमध्ये जे काही झाले, त्यावर शेजारील देश म्हणून चिंता आहेच. तेथील स्थिती लवकर सुधारावी, अशी आशा व्यक्त करतो. खास करून 140 कोटी देशवाशियांना तेथील हिंदू, अल्पसंख्यांकाची सुरक्षेची चिंता आहे.’ मोदींनी याआधीही मोहम्मद यूनुस यांना शुभेच्छा देताना हिंदूंना सुरक्षा देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आज दुसऱ्यांदा त्यांनी त्यावर भाष्य केले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनीही बांगादेशी हिंदूविषयी चिंता व्यक्त केली. त्यांनी नागपूर येथील आरएएसच्या मुख्यालयात गुरूवारी ध्वजारोहण केले. त्यानंतर बोलताना भागवत म्हणाले, शेजारील देशात हिंसा होत आहे. तिथे राहणाऱ्या हिंदूंना विनाकारण लक्ष्य केले जात आहे. दुसऱ्यांची मदत करण्याची परंपरा भारतात आहे. भारताने आतापर्यंत कुणावरही हल्ला केलेला नाही. उलट अडचणीत सापडलेल्या लोकांची मदतच केली आहे.

Narendra Modi, Mohan Bhagwat
Pm Narendra Modi : 1 लाख तरूणांना राजकारणात आणणार, पण PM मोदींनी घातल्या 'या' अटी

हिंदूच्या सुरक्षेबाबत सरकारकडे बोट दाखवत भागवत यांनी सूचक विधान केले. ते म्हणाले, अस्थिरता आणि अराजकतेचे चटके सोहणाऱ्या लोकांवर अन्याय, अत्याचार होऊ नये, ही जबाबदारी आपल्या देशाची आहे. काही गोष्टींमध्ये सरकारला आपल्या स्तरावरही पाहावे लागते, पण त्याला समाजाने आपले कर्तव्य पार पाडल्यानंतर ताकद मिळते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com