Pappu Yadav | Lawrence Bishnoi Sarkarnama
देश

Baba Siddique Dead Updates: बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या बिश्नोई गँगला बिहारच्या खासदाराचं खुलं चॅलेंज

Bihar MP Pappu Yadav on Lawrence Bishnoi Gang:"जेलमध्ये असलेला एक गुन्हेगार आवाहन देतो, नागरिकांना मारण्याची धमकी देत आहे. यावर आपण सगळ्यांनी मौन धारण केले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: अजित पवार गटातील आमदार, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात राजकारण सुरु झाले आहे. कायदा सुव्यवस्थेबाबत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले आहे. दरम्यान सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगला खुले आव्हान दिले आहे.

कायद्याने मला परवानगी दिली तर मी 24 तासांच्या आत लॉरेन्स बिश्नोई गँगला संपवून टाकेन, या गँगचे नेटवर्क उद्धवस्थ करुन टाकेल, असे आव्हान पप्पू यादव यांनी बिश्नोई गँगला दिले आहे.

पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी एक्सवरुन बिश्नोई गँगला चॅलेंज दिले आहे. "जेलमध्ये असलेला एक गुन्हेगार आवाहन देतो, नागरिकांना मारण्याची धमकी देत आहे. यावर आपण सगळ्यांनी मौन धारण केले आहे. लॉरेन्स बिश्नोईने मूरेवाला, करणी सेनेचे प्रमुख, आता बाबा सिद्दीकी यांची हत्या केली आहे. कायद्याने मला परवानगी दिली तर मी लॉरेन्स बिश्नोई सारख्या कच्चा कैद्याला 24 तासांच्या आत संपवून टाकेल," असे पप्पू यादव यांनी एक्सवर म्हटलं आहे.

बाबा सिद्दीकी हे मुळचे बिहार येथील आहेत. बाब सिद्दीकी हे बिहारचे सुपुत्र होते, असे पप्पू यादव यांनी यापूर्वी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. बाबा सिद्दिकी हत्येचा तपास मुंबई गुन्हे शाखा करीत आहे. या तपासात पोलीस लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्याची शक्यता आहे.

लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. येथे जाऊन पोलीस त्याची चौकशी करणार असल्याची माहिती आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येत बिश्नोई गँगचा हात असल्याचे सबळ पुरावे मिळाल्यास पोलिस त्याला ताब्यात घेण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण बिश्नोई याच्या जीवाला धोका असल्यामुळे त्याचा ताबा देण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

मोसाद स्टाईल पॅटर्न

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीनं घेतली आहे. या हत्याकांडातील आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारीची राहिलेली नाही. त्यामुळे ही हत्या इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या स्टाईलनं करण्यात आल्याची चर्चा आहे.

बाहुबली नेता अतीक अहमद, त्याचा भाऊ अशरफ, गँगस्टर संजीव माहेश्वरी उर्फ जीवा, मुन्ना बजरंगी यांच्या हत्या आणि बाबा सिद्दीकी यांची हत्या यामध्ये बरेच समान धागे असल्याचे दिसते. या सगळ्याच हत्या मोसाद स्टाईलनं करण्यात आल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवनं उत्तर प्रदेशात या पॅटर्नची सुरुवात केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT