Sharad Pawar: शरद पवारांचा पक्ष काँग्रेसचा खेळ बिघडविणार; पुण्यात दोन मतदारसंघात होणार तडजोड?

Maharashtra Vidhan Sabha Election Hadapsar Parvati Assembly constituency: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना ठाकरे गटाला वेगळी ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे. मात्र या ऑफरमुळे काँग्रेसने दावा केलेली जागा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपासाठी महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. बैठकांमध्ये बहुतांश जागांवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचे एकमत झाले आहे. काही जागांचा पेच अद्यातही फसलेला आहे. यामध्ये पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे.

दोन्ही पक्ष हडपसरच्या जागेवर अडून बसल्याने जागा वाटपाचा पेच फसला आहे. हा तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेना ठाकरे गटाला वेगळी ऑफर दिली असल्याचं बोललं जात आहे. मात्र या ऑफरमुळे काँग्रेसने दावा केलेली जागा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात हा पेज आणखी वाढणार असून महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ येतात. या आठ विधानसभा मतदारसंघांमधील कोथरूड, हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वडगाव शेरी, हडपसर,खडकवासला हे मतदारसंघ आपल्याकडे राहावे यासाठी प्रयत्न करत आहे. तर काँग्रेस कसबा कॅन्टोन्मेंट शिवाजीनगर बरोबर पर्वतीही आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे.

Sharad Pawar
Maharashtra Vidhan Sabha Election: आचारसंहिता उद्यापासून लागणार? शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक

आता हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघावरील ठाकरे गटाने दावा सोडावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठाकरे सेनेला पर्वती विधानसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवली असल्याचं बोललं जात आहे. या मतदारसंघांमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम या इच्छुक आहेत. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.

Sharad Pawar
Bachchu Kadu: पश्चिम महाराष्ट्रातील सहा मतदारसंघात बच्चू कडू नशीब आजमावणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेऊन आबा बागुल यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा यासाठी प्रयत्न घेतल्याचा देखील समोर आलं होतं. ठाकरे गटाला हा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघांमधून माजी नगरसेवक बाळा ओसवाल हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सोडण्याची खेळी खेळल्यास आगामी काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये आणखी तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com