Muhammad Yunus Sarkarnama
देश

Muhammad Yunus : हिंदूंवर हल्ले होत असताना मोहम्मद यूनुस पहिल्यांदाच गेले मंदिरात; म्हणाले...

Bangladesh Crisis Hindu Temple : बांगलादेशमध्ये अंतरिम सरकरा स्थापन होऊनही काही भागात हिंदूंवर हल्ले होत आहेत.

Rajanand More

New Delhi : बांगलादेशातील तणाव निवळू लागला असला तरी अद्याप देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. अंतरिम सरकार अस्तित्वात येऊनही काही भागात हे हल्ले सुरूच आहेत. यापार्श्वभूमीवर सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी मंगळवारी मोठे पाऊल उचलले.

यूनुस हे अंतरिम सरकारच्या प्रमुखपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच मंदिरात गेले. त्याआधी त्यांनी हिंदूंवरील हल्ल्यांबाबत चिंताही व्यक्त केली होती. मंदिरात जाऊन त्यांनी काही हिंदूंशी चर्चा करत सरकार तुमच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले. त्यांच्या सद्यस्थितीची चौकशीही केली.

यूनुस यांनी हिंदू मंदिरात भेटीदरम्यान म्हटले की, बांगलादेशात सर्वांसाठी सारखेच अधिकार आहेत. मग तो कोणत्याही धर्माचा असो. लोकशाहीमध्ये कुणाला मुस्लिम, हिंदू किंवा बौध्द या रुपात नव्हे तर मानवेतच्या भावनेतून पाहायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी हिंदूवरील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे यूनुस यांनी हिंदू मंदिरात जात भारतालाही एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे. हिंसाचारामुळे बांगलादेशाची स्थिती डळमळीत झाली आहे. पुढील काळात आर्थिक कणा मोडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. भारताच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे.

बांगलादेश आणि भारतातील संबंध पूर्वीप्रमाणेच चांगले राखण्यासाठी यूनुस हेही प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच त्यांचे मंदिरात जाणे म्हणजे एक रणनीती असल्याचेही जाणकार सांगतात. तसेच अंतरिम सरकारमध्ये धार्मिक मुद्द्यांशी संबंधित विभागाने कोणत्याही धार्मिक स्थळांवर हल्ल्यांची माहिती देण्यासाठी एक हॉटलाईनही तयार केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे यूनुस यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT