Muhammad Yunus : मोहम्मद युनूस यांनी शेख हसीनांच्या परतीचे दोर कापले? एका शब्दाने केलं घायाळ...

Sheikh Hasina Bangladesh Crisis : बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडाल्यानंतर शेख हसीना यांनी पलायन करत भारतात आश्रय घेतला आहे.
Muhammad Yunus Sheikh Hasina
Muhammad Yunus Sheikh HasinaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : बांगलादेशातील हिंसाचाराची स्थिती काहीप्रमाणात निवळू लागल्याने माजी पंतप्रधान शेख हसीना पुन्हा मायदेशी परतणार का, याच्याही चर्चा झडू लागल्या आहेत. पण अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद यूनुस यांनी एकाच शब्दात त्यांच्या परतीचे दोर कापल्याचे मानले जात आहे.

यूनुस यांनी शेख हसीना यांना पुन्हा बांगलादेशात येऊ देणार नाही, असे विधान केलेले नाही. पण त्यांचा राक्षस असा उल्लेख करत त्यांनी सूचक इशारा दिल्याचे मानले जात आहे. शेवटी याक्षणी राक्षस गेला आहे, असे विधान यूनुस यांनी केले आहे. त्यावरून आता तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. शेख हसीना यांच्याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये असलेला राग राक्षस या शब्दप्रयोगाने आणकी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Muhammad Yunus Sheikh Hasina
Supreme Court : नाहीतर 'लाडकी बहीण'बाबत आदेश देऊ..! सुप्रीम कोर्टाचा शिंदे सरकारला इशारा...

यूनुस नोबल पुरस्कारविजेते आहेत. त्यामुळे देशात त्यांच्याविषयी आदराचे स्थान आहे. आता ते अंतरिम सरकारचे प्रमुख बनल्याने त्यांच्या प्रत्येक विधानाला महत्व प्राप्त झाले आहे. त्यांनी रविवारी रात्री उशिरा विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर माध्यमांनाही प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शेख हसीना यांच्याविषयी हे विधान केले आहे.

यूनुस यांनी अंतरिम सरकारलाही सतर्क केले आहे. तुम्ही निर्णय घेण्यास ज्याक्षणी सुरूवात कराल, त्यावेळी काही तो निर्णय आवडेल, काहींना आवडणार नाही. असेच काम पुढे न्यावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. युनूस यांनी लढा उभारणाऱ्या विद्यार्थ्यांचेही कौतुक केले आहे. त्यांच्या आदेशामुळेच आपण सरकारचे प्रमुख बनल्याचेही यूनुस यांनी म्हटले आहे.

Muhammad Yunus Sheikh Hasina
Independence Day : ध्वजारोहणावरून तापलं राजकारण; प्रशासनाने मंत्र्यांचा आदेश धुडकावला...

बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टच्या सरन्यायाधीशांनाही राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले होते. त्याचेही यूनुस यांनी समर्थन केले आहे. यातून योग्य मार्ग काढला जाईल, असे म्हणत यूनुस यांनी विद्यार्थ्यांच्या मागे आपण ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळेच शेख हसीना यांचे परतीचे दोर कापले गेल्याचे मानले जात आहे.

शेख हसीना भारतात किती दिवस राहणार, हे सध्यातरी निश्चित आहे. त्या कोणत्या देशात जाणार, बांगलादेशात परत जाण्यासाठी तयारी सुरू आहे का, हे प्रश्नही अनुत्तरित आहेत. बांगलादेशातील स्थिती अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. सध्यातरी अंतरिम सरकार काम पाहणार असल्याने सार्वत्रिक निवडणुकांसाठी पुढील काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com