Bangladesh Protest News : बांगलादेशात हिंसाचारामुळे अराजकता पसरली आहे, अशी परिस्थिती भारतातही होऊ शकते, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली आहे. त्यांचा या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशात शांतता दिसत असली तरी आपलाही बांगलादेश होऊ शकतो, असे भाकीत त्यांनी केले आहे.
बांगलादेशात ज्या मुद्दांवर हिंसाचार होत आहे, तशाच प्रकार आपल्या देशातही होऊ शकतो, असे सांगत सलमान खुर्शीद यांनी दिल्लीत काही महिन्यापूर्वी झालेल्या शाहीन बाग आंदोलनाचे उदाहरण दिले आहे.
शाहीन बाग आंदोलनकर्ते अद्यापही कारागृहात आहेत. या आंदोलनाशी संबधीत व्यक्तींची परिस्थिती काय आहे, ते या देशाचे शत्रू आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शाहीन बाग सारखे आंदोलन आपल्या देशात आता होणार नाही, काही जण आंदोलनातील लोकांना देशाचे शत्रू मानतात, असा आरोप त्यांनी केला.
बांगलादेशातील परिस्थिती सध्या चिघळली आहे. शेख हसीना सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या एअरबेसवर आहेत. त्या युरोपीय देशात शरण घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांची बहीण रेहाना यांच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे. त्यामुळे त्या ब्रिटनला जाणार असल्याचे समजते. पण ब्रिटनकडून अद्याप क्लीअरन्स आलेले नाही. लवकरच त्या भारत सोडणार असल्याचे समजते.
बांगलादेशाच्या लष्कराने सोमवारी शेख हसीना यांना देशाच्या बाहेर जाण्यासाठी व्यवस्था केली होती. सरकारी नोकरीतील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीवरून गेल्या महिन्यात सुरू झालेल्या उग्र आंदोलनाचा शेवट अखेर हसीना यांनी पंतप्रधानपद सोडून देशाबाहेर पलायन करण्यात झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.