Ajit Pawar: अजित पवार अन् अमित शाह यांच्यात खलबतं; विधानसभेसाठी फॉर्म्युला ठरला?

Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाह यांच्यासमवेत अजित पवार यांची चर्चा पार पडल्यानंतर आज रात्री उशीरा ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar and Amit Shah
Ajit Pawar and Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Political News : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे, आता आगामी विधानसभेत तरी आपली जादू चालावी यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत.

विधानसभा जागा वाटप लवकरात लवकर व्हावं, यासाठी अजित पवार यांनी मंगळवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. पुण्यातील भेटीदरम्यान जागा वाटपासाठी अमित शाह यांना विनंती केल्यानंतर त्यानंतरची अजितदादांची ही दुसरी भेट होती.

मंगळवारी झालेल्या भेटीत जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांची दिली आहे. अमित शाह यांच्यासमवेत अजित पवार यांची चर्चा पार पडल्यानंतर आज रात्री उशीरा ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागा वाटपाचे सूत्र ठरणार असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसला. आता आगामी विधानसभेत तरी आपली जादू चालावी यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. ‘जनसन्मान यात्रा’ सुरु होणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून सुरू होणारी यात्रा पहिल्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भातून जाणार आहे. 24 दिवसांमध्ये 39 विधानसभा मतदारसंघांमध्ये दौरे करून ते सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहेत.

Ajit Pawar and Amit Shah
Ajit Pawar : अजितदादांनी विरोधकांना केला 'जय महाराष्ट्र'; त्यांनी राजकारण करीत राहावे...!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांनी राष्ट्रवादीतील बंडानंतर राज्याकडे आता लक्ष केंद्रित केले आहे. जनसन्मान यात्रेचा टिझर प्रसिद्ध झाला आहे.

'सन्मान की बदले जान भी दे तो नही है घाटा रे!' हे गाणं आहे. त्यामध्ये अजित पवारांनी आम्ही शब्दांचे पक्के आहोत, आम्ही जो वादा करतो तो पुराच करतो. या यात्रेच्या माध्यमातून सन्मान, संवाद, सशक्तिकरण हे मुद्दे डोळ्यासमोर असतील असा उल्लेख केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी त्यांच्याकडे ५४ जागा होत्या. अजित पवार यांनी महायुतीत सहभागी झाल्यानंतर त्यांनी ८० ते ९० जागांवर दावा केला आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र येथे 20 जागांवर उमेदवार उतरविण्याच्या विचारात अजित पवार आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com