Nobel Laureate Muhammad Yunus : सरकारविरोधी आंदोलन तीव्र झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडावा लागला त्याला 24 तास उलटताच ‘स्टूडेंट्स अगेंस्ट डिस्क्रिमिनेशन’च्या नेत्यांनी मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) हे देशाच्या अंतरिम सरकारचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले आहे.
आंदोलनाचे प्रमुख नाहिद इस्लाम यांनी समाज माध्यमावर व्हिडिओ शेअर करीत आपण मोहम्मद युनूस यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे, ते ही जबाबदारी घेण्यास तयार असल्याचे म्हटलं आहे.
विद्यार्थी चळवळीचे नेते नाहीद इस्लाम, आसिफ मेहमूद, अबू बकर मजुमदार यांनी डॉ. युनूस यांच्या नावाची घोषणा केली आहे. ८४ वर्षांचे डॉ. युनूस अंतरिम सरकारचा कार्यभार स्वीकारणार असल्याचे तिघांनी सांगितले.
मोहम्मद युनूस हे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ आहेत. बांगलादेशातील सर्वसामान्याच्या विनंतीनुसार युनूस यांनी देशाचे नेतृत्व करण्यास मान्यता दिली आहे. ते सध्या पॅरिसमध्ये आहेत. लवकरच ते बांगलादेशात येणार आहेत.
शेख हसीना बांगलादेश सोडल्यानंतर डॉ. यूनुस म्हणाले, "आता आमचा देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. आता आम्ही मुक्त झालो आहोत. शेख हसीना येथे असताना आमच्यावर त्यांची सत्ता होती. त्या हुकमशाह होत्या. एका हुकुमशाह प्रमाणे त्या जनतेशी वागत होत्या," त्यांनी शेख हसीनांच्या हकालपट्टीचे स्वागत केले आणि या विकासाला देशाची 'दुसरी मुक्ती' असे म्हटले.
"आंदोलक आपला राग काढत आहेत. आज उपद्रव करणारे हेच विद्यार्थी आणि तरुण देशाला योग्य दिशेने घेऊन जातील अशी आशा आहे. शेख हसीना निवडणुकीमध्ये हेराफेरी करायच्या. त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली होती की त्यांना राजकीय प्रतिसाद देणे कठीण झाले आहे," असे यूनुस यांनी सांगितले.
युनूस यांच्या गरीब जनतेला बँकिंग सुविधा देण्याच्या प्रयोगामुळे बांगलादेशाला सूक्ष्म कर्जाचे केंद्र म्हणून ओळख मिळाली.हसीना सरकार आणि यूनुस यांच्यामध्ये अनेक वर्षापासून शाब्दीक वाद सुरू आहे. २००८ मध्ये हसीना सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी युनूस यांच्याविरुद्ध अनेक तपास सुरू केले. नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून युनूस यांना संस्थापक व्यवस्थापकीय संचालक पदावरून काढून टाकले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.