Bangladesh Violence Sarkarnama
देश

Bangladesh Violence : एअर इंडिया, इंडिगोने ढाकाला विशेष विमानं पाठवून भारतीयांना सुखरुप आणलं मायदेशी!

Mayur Ratnaparkhe

India Stand on Bangladesh Violence : एअर इंडिया आणि इंडिगोकडून बांगलादेशात उफाळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथील भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, यासाठी विशेष विमानं ढाका येथे पाठवली गेली. यातून 400 पेक्षा अधिक भारतीय सुखरूप मायदेशी परतले आहेत.

या नागरिकांमध्ये 199 वयोवृद्ध आणि सहा बालकांचाही समावेश आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, एअर इंडियाचे एक विशेष विमान बुधवारी सकाळी सहा बालकांसह 205 जणांना ढाका येथून दिल्लीत घेऊन आले आहे.

याशिवाय इंडिगोच्या विशेष विमानाने देखील ढाका येथून भारतीयांना मायदेशी आणलं आहे. हे विमान मंगळवारी ढाका येथून कोलकाताच्या दिशेने रवाना झालं होतं. ढाका विमानतळ तात्पुरते बंद झाल्यानंतर इंडिगोने 06 ऑगस्ट 2024 रोजी ढाका ते कोलकाता एक विशेष उड्डाण 6E 8503चालावले. हे उड्डाण बांगलादेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी होते, अशी माहिती एअरलाइनने दिली आहे.

बांगलादेशातील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथील उच्चायुक्तालय आणि वाणिज्य दूतावासातील अतिरिक्त कर्मचाऱ्यांना मायदेशी बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. येथील 190 कर्मचारी हे मायदेशी परतले आहेत. केंद्र सरकारने स्थानिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

अनेक भागांमध्ये हिंदूंच्या घरांवर हल्ले होऊ लागले आहेत. शिवाय, बांगलादेशातील दहा ठिकाणांवरील मंदिरांची जाळपोळ करण्यात आली असून यावर भारतातील अनेक साधू महंतांनी चिंता व्यक्त केली आहे. भारत सरकार येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

बांगलादेशातील हिंसाचाराचे सत्र कायम असून हजारो आंदोलक अद्याप रस्त्यांवरच ठाण मांडून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हसीना यांच्या अवामी लीग पक्षाच्या 20 नेत्यांची आंदोलकांनी हत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. आतापर्यंत देशात विविध ठिकाणांवर झालेल्या हिंसाचारामध्ये चारशेपेक्षाही अधिक लोक मरण पावले आहेत.

देशात अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले हे विद्यार्थी चळवळीच्या मूलभूत तत्त्वांच्याविरोधातील असून स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने अल्पसंख्याक समुदायातील कुटुंबे आणि त्यांच्या संपत्तीचे संरक्षण करावे असे आवाहन ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बांगलादेश’कडून करण्यात आले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT