Muhammad Yunus : नोबेल विजेत्याच्या हाती बांगलादेशची धुरा, अध्यक्षांनी केली नियुक्ती

Bangladesh Protests : बांगलादेशातील वातावरण चिघळल्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मोहम्मद युनूस यांची नियुक्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती.
Muhammad Yunus.jpg
Muhammad Yunus.jpgsarkarnama
Published on
Updated on

आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशात हिंचासार उफाळून आला आहे. यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी मंगळवारी 'जातीय संसद' ( बांगलादेशचे सर्वोच्च कायदेमंडळ ) विसर्जित केली.

त्यामुळे बांगलादेशचे ( Bangladesh ) अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी नोबेल पारितोषिक विजेते बँकर मोहम्मद युनूस यांची हंगामी सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

युनूस यांच्याकडे अंतरिम सरकारचं नेतृत्व देण्यासंदर्भातील प्रस्ताव आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी स्वीकारला आहे. या बैठकीत आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या विद्यार्थी नेत्यांसह तीनही दलाचे प्रमुख उपस्थित होते. युनूस यांच्याकडे हंगामी सरकारचं नेतृत्व सोपवण्याचा आग्रह तेथील विद्यार्थी संघटनांनी धरला होता.

Muhammad Yunus.jpg
Khaleda Zia : शेख हसीना यांनी भारताचंही टेन्शन वाढवलं; खालिदा जिया यांची मुक्तता...

मोहम्मद युनूस हे नेहमीच शेख हसीन यांचे विरोधक राहिले आहेत. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर एका मुलाखतीत मोहम्मद युनूस म्हणाले, "विद्यार्थ्यांचे आंदोलन हा बांगलादेशचा दुसरा मुक्तीसंग्राम होता. हसीना देश सोडून गेल्यानं आम्ही मुक्त झालो आहोत. आम्ही एक स्वतंत्र देश आहोत. जोवर हसीना येथे होत्या, तोपर्यंत आम्ही त्यांच्या ताब्यात होतो. त्या एका हुकूमशहा प्रमाणे वागत होत्या. सर्व काही नियंत्रणात ठेवत होत्या."

Muhammad Yunus.jpg
Bangladesh Crisis : बांगलादेशवर करडी नजर, पण भारतीयांना लगेच परत आणणार नाही! सरकारकडून स्पष्टीकरण

कोण आहेत मोहम्मद युनूस -

28 जून 1940 रोजी मोहम्मद युनूस यांचा जन्म झाला. युनूस हे बांगलादेशातील उद्योजक, बँकर, अर्थतज्ञ आणि सामाजिक नेते आहेत. गरीबी निर्मूलनासाठी प्रयत्न केल्याबद्दल युनूस यांना 2006 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. युनूस यांनी 1983 मध्ये ग्रामीण बँकेची स्थापना केली, जी गरीब लोकांना लहान कर्ज देते. बांगलादेशला त्यांच्या ग्रामीण बँकेच्या माध्यमातून मायक्रोक्रेडिटसाठी जगभरात प्रशंसा मिळाली. ज्यामुळे बांगलादेशातील लोकांना मोठ्या संख्येनं जीवनमान उंचाविण्यात यश आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com