Bangladesh Prime Minister Sheikh Hasina Sarkarnama
देश

Sheikh Hasina Resigns : मोठी बातमी! शेख हसीना भारतात दाखल, पंतप्रधानपदाचा दिला राजीनामा

Akshay Sabale

Bangladesh Prime Minister Sheikh Hasina Resigned : नोकऱ्यांमधील आरक्षणावरून बांगलादेशात हिंसाचार उफाळला आहे. पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. यातच शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याची माहिती बांगलादेशच्या लष्करप्रमुखांनी दिली आहे. तसेच, पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडले असून भारतात दाखलं झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सोमवारी ढाकात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. सुमारे 4 लाख लोक रस्त्यावर उतरले आहेत. राजधानीत ठिकठिकाणी हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटना घडत आहे. शेख हसीना यांनी ढाका सोडले असून त्या पश्चिम बंगालमधून लष्करी हेलिकॉप्टरनं भारतात दाखल झाल्याचं बोललं जात आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या बहीण रेहानाही आहेत. हजारो लोकांनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानाचा ताबा घेतला आहे. याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत.

बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकाल-उझ-जमान यांनी म्हटलं, "सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील. देशात शांतता प्रस्थापित करू. तोडफोड, जाळपोळ आणि मारामारीपासून दूर राहा. मारामारी आणि हिंसाचाराने काहीही साध्य होणार नाही. संघर्ष आणि गोंधळापासून दूर राहा."

"आम्ही सर्व पक्षांशी चर्चा केली आहे. शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. आता अंतरिम सरकार बनवून राज्य करू. मालमत्तेचे नुकसान होत आहे. मला जबाबदारी द्या, मी सर्वकाही सांभाळेन," असं आवाहन लष्करप्रमुख जनरल वकाल-उझ-जमान यांनी केलं आहे.

"मी लष्कर आणि पोलिसांना लगेच गोळीबार न करण्याचे आदेश देत आहे. देशात कोणतीही आणीबाणी किंवा कर्फ्यू लागू नाही. आम्हाला शांतात प्रस्थापित करायची आहे," असं असं लष्करप्रमुख जनरल वकाल-उझ-जमान यांनी म्हटलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT