Chinmay Prabhu Sarkarnama
देश

Chinmay Krishna Das Prabhu : बांग्लादेशात हिंदू नेत्याला अटक; देशद्रोहाचा खटला चालणार?

Bangladesh Police attacks on Hindus : बांग्लादेशात हिंदूंवरील हल्ल्यांच्या विरोधात चिन्मय कृष्ण दास प्रभू यांनी हिंदूंना एकत्रित करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

Rajanand More

New Delhi : बांग्लादेशातील हिंदूना संघटित करून अत्याचाराविरोधात आंदोलन करणारे चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना अटक करण्यात आले आहे. ढाका विमानतळावर त्यांना बांग्लादेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. त्यांच्यावर यापूर्वीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याअंतर्गतच त्यांना अटक करण्यात आल्याचे समजते.

चिन्मय कृष्ण दास प्रभू हे ISKCONचे सदस्य आहेत. त्यांनी बांग्लादेशातील रंगपूर येथे 22 नोव्हेंबर रोजी हिंदूंच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. त्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. या रॅलीतून हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराला विरोध करण्यात आला होता. तसेच त्यांनी अंतरिम सरकारवर हिंदूंना आपआपसांत लढवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप केला होता.

बांग्लादेशातील मेहरपूर येथील इस्कॉन मंदिरावर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. त्यावर बोलताना चिन्मय प्रभू यांनी हिंदू मंदिरांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती. तीन मंदिरांना धोका आहे. आतापर्यंत हिंदू समाजातील काही लोकांनी मुस्लिम समाजातील काही लोकांच्या मदतीने मंदिरांना वाचवले आहे. अनेक हिंदू आणि अल्पसंख्याक असुरक्षित असून पश्चिम बंगाल, त्रिपुरातून भारतात जात असल्याचा दावाही त्यांनी केला होता.

देशद्रोहाचे आरोप

बांग्लादेश सरकारने चिन्मय प्रभु यांच्यावर ऑक्टोबर महिन्यात देशद्रोहाचे आरोप केले होते. हिंदू संघटनेशी संबंधित इतर लोकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिन्मय प्रभू यांच्याशिवाय इतर 19 हिंदू संघटनांचे नेते आणि कार्यकर्त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, बांग्लादेशात विद्यार्थी आंदोलनामुळे शेख हसीना यांना भारतात पलायन करावे लागले. त्यानंतर देशात अंतरिम सरकार आले. या काळात अल्पसंख्यांक हिंदूना लक्ष्य केले जात आहे. आंदोलनादरम्यानही हिंदूंची घरे व धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून बारत सरकारनेही चिंता व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT