Gautam Adani Case : अदानींच्या ‘त्या’ 100 कोटींबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय; अधिवेशनाआधीच एक घाव..!

Telangana Government Congress : अमेरिकेत उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात लाच दिल्याचा आणि फसवणुकीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात अटक वॉरंटही बजावण्यात आले आहे.
Gautam Adani, Rahul Gandhi
Gautam Adani, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत दाखल करण्यात आलेल्या खटल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला होता. याप्रकरणी काँग्रेसच्या सरकारमधील प्रकल्पांची चौकशी व्हावी, अशी ठाम भूमिकाही त्यांनी मांडली होती. त्यानंतर अदानींनी तेलंगणातील काँग्रेस सरकारला दिलेल्या मदतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी अदानींनी तेलंगणातील एका विद्यापीठासाठी शंभर कोटींचा निधी दिला होता. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्याकडे अदानींनी या रकमेचा धनादेश सुपुर्द केला होता. त्यावरून भाजपनेही काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यातच अदानींचे कथित लाचप्रकरण उजेडात आल्यानंतर राहुल गांधींनी त्यांना अटक करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे आजपासून संसदेचे अधिवेशन सुरू झाले असून पहिल्या दिवशी संसदेत यामुद्यावरून विरोधकांनी हंगामा केला.

Gautam Adani, Rahul Gandhi
Nana Patole : नाना पटोलेच प्रदेशाध्यक्ष; खर्गेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?

यापार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने अदानींचे शंभर कोटी रुपये परत देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रेवंथ रेड्डींनी माहिती दिली. ते म्हणाले, सरकारने यंग इंडिया स्कील युनिव्हर्सिटीसाठी कोणत्याही संस्थेकडून निधी घेतलेला नाही. त्यामध्ये अदानी ग्रुपचाही समावेश आहे. काल सरकारने अदानी ग्रुपला पत्र लिहून शंभर कोटी रुपये स्वीकारणार नसल्याचे कळवले आहे.

राहुल गांधी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने नियमानुसार टेंडर प्रक्रिया पार पाडायला हवी. त्यानंतर टेंडर द्यायला हवेत, मग ते अदानी, अंबानी किंवा टाटा असोत, असेही ऱेड्डी म्हणाले. अनेक कंपन्यांनी विद्यापीठासाठी निधी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Gautam Adani, Rahul Gandhi
Lok Sabha Winter Session 2024 : राहुल गांधींचं ट्विट अन् लोकसभेत हंगामा; कामकाज बुधवारपर्यंत स्थगित

दरम्यान, भारतातील विविध राज्यांतील वीज निर्मिती प्रकल्पांसाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा गंभीर आरोप असलेला खटला अदानींविरोधात अमेरिकेत दाखल करण्यात आला आहे. अमेरिकेतील गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अदानी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com