Bank Strike 
देश

Bank Strike: देशभरात बँक संघटनांची बंदची हाक! काय आहेत मागण्या? कधी अन् किती दिवस राहणार बंद?

Bank Strike: युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारला आहे.

Amit Ujagare

Bank Strike: विविध बँकांच्या राष्ट्रीय संघटनेनं देशभरात आपल्या विविध मागण्यांसाठी संपाची हाक दिली आहे. त्यामुळं सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सर्वसामान्य बँक ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पण बँकांचा बंद कधी आणि किती कालावधीसाठी असणार आहे? जाणून घ्या.

कधी अन् किती दिवसांसाठी करणार संप

एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या (UFBU) वतीनं ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचं आंदोलन केलं जाणार आहे. त्यानंतर २८ ते ३० सप्टेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत बँक कर्मचारी संपूर्ण कामकाज बंद ठेवणार आहेत. UFBU नं सरकारला इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर २६ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात अनिश्चित काळासाठी आंदोलन सुरु केलं जाईल.

इतक्या संघटनांचं प्रतिनिधीत्व

UFBUच्या निवेदनानुसार, या फोरममध्ये देशभरातील सर्व ७ बँक कर्मचारी संघटनांचा समावेश आहे. यामध्ये AIBEA, AIBOC, NCBE, AIBOA, BEFI, INBOC आणि INBEF या संघटनांचा समावेश आहे. तसंच हा फोरम सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खासगी क्षेत्रातील बँका, इंटरनॅशनल बँक, प्रांतिक बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधीत्व करतो.

बँकांच्या मागण्या काय?

फोरमच्या अधिकृत निवेदनानुसार, बँक संघटनांची चार प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये पाच दिवसांचा बँकिंग आठवडा करा, परफॉर्मन्स लिंक्ड इन्सेटिव्ह स्कीम सरकारनं मागे घ्यावी, दोन्ही बाजूंनी चर्चा करुन इन्सेंटिव्ह स्कीममध्ये बदल करणे आणि उर्वरित मुद्द्यांवर तोडगा काढणे यांचा समावेश आहे. पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. बँक संघटनांच्या मते, बँक २०१५ मध्ये पाच दिवसांच्या आठवड्याकडं जात असताना तात्विकदृष्ट्या सहमती दर्शवली होती. तर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी घोषित करण्यात आली होती. त्यानुसारच सध्या बँकांचं कामकाज सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT