Ramesh Mhatre: कल्याणच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर केलेल्या हल्ला प्रकरणी शिवेसनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला सुप्रीम कोर्टानं आज मंगळवारी झाप झाप झापलं. तसंच रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्यांना हलक्यात घेतलं जाऊ शकत नाही. तसंच असे लोक जामिनाच्या लायक नाहीत, अशी टिप्पणीही कोर्टानं यावेळी केली.
लाईव्ह लॉच्या माहितीनुसार, न्या. विक्रम नाथ, न्या. संदीप मेहता आणि न्या. ए. जी. मसीह यांचं खंडपीठासमोर म्हात्रेंच्या डॉक्टर मारहाणीच्या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी म्हात्रेंनी हायकोर्टानं जामीन देताना लावलेल्या अटी-शर्तींना आव्हान दिलं होतं.
यावेळी खंडपीठानं कडक शब्दांत टिप्पणी केली की, "अशा प्रकारचे लोक हे जामिनाच्या लायकीचे नाहीत. यांच्यामध्ये डॉक्टरीपेशासाठी कुठलाही सन्मान नाही. विचार करा जेव्हा एखादी गर्दी तुमच्यावर हल्ला करते तेव्हा त्या व्यक्तीला किती मानसिक धक्का बसत असेल. तुम्ही रुग्णालयांमध्ये जाऊन कुठल्याही अनोळखी व्यक्तीला मारहाण कराल का?"
यावेळी म्हात्रेच्यावतीनं ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. त्यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, "मुंबई हायकोर्टानं त्यांच्या जामिनासाठी कडक अटी घातल्या आहेत. तसंच विचारणा केली की, १० दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात. पण सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात संकेत दिले की, ही ट्रायल कोर्टाच्यावतीनं देण्यात आलेल्या जामिनाला स्थगिती देणाऱ्या मुंबई हायकोर्टाचा आदेश कायम ठेवू इच्छित आहे."
यावेळी न्या. नाथ यांनी टिप्पणी केली की, हायकोर्टानं स्वतः दखल घेणं हे पूर्णतः न्यायसंगत होतं. जेव्हा रोहतगी यांनी युक्तीवाद केला की, म्हात्रेची संबंधित डॉक्टरसोबत कुठलीही वैयक्तिक शत्रुत्व नव्हतं. यावर कोर्टानं म्हटलं की, व्हिडिओ तर आधीच व्हायरल झाला होता.
६ जुलै २०२६ रोजी एक गर्भवती महिला प्रसुतीकळांनी व्याकूळ होत होती, पण तिला अनेक तास रुग्णालयात थांबवून ठेवण्यात आलं. या महिलेच्या नातेवाईकांनी नगरसेवक रमेश म्हात्रेंना वारंवार फोन करुन रुग्णालय प्रशासनाला या महिलेला लवकर अॅडमिट करुन घेण्याची मागणी करत होते. वारंवार फोन येत असल्यानं रमेश म्हात्रे रुग्णालयात गेले, यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला यानंतर म्हात्रेनं तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर ७ जुलै रोजी एफआयआर दाखल करण्यात आला. यामध्ये म्हात्रेला आरोप क्रमांक १ बनवण्यात आलं.
यानंतर कल्याणच्या स्थानिक कोर्टानं त्याला १४ जुलै रोजी म्हात्रेचा जामीन मंजूर केला होता. डॉक्टरांच्या विरोधानंतर हायकोर्टानं १८ जुलै रोजी स्वतःहून दखल घेत जामीन आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर रमेश म्हात्रेला आत्मसमर्पण करावं लागलं. यानंतर सुमारे दोन आठवड्यांनंतर कोर्टानं त्यांना जामीन दिला होता. याचिकेत हायकोर्टाच्यावतीनं नंतर घातलेल्या कठोर अटींविरोधातही आव्हान देण्यात आलं आहे. यामध्ये म्हात्रेला गोव्याच्या कळंगुटमध्ये राहणे, आठवड्यातून तीन वेळा अंजना पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणे आणि खटल्याला सुरुवात होईपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर राहण्याचे निर्देश दिले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.