Amit Shah, Jay Shah Sarkarnama
देश

Jay Shah : गृहमंत्र्यांचे पुत्र जय शाहांनी क्रिकेटमध्ये घडवला इतिहास; पाकिस्तानचे धाबे दणाणले...

Amit Shah International Cricket Council BCCI : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

Rajanand More

New Delhi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी इतिहास घडवला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (ICC) अध्यक्षपदी त्यांनी बिनविरोध निवड झाली आहे. ते सर्वात कमी वयाचे अध्यक्ष ठरणार आहेत. पण शाह यांच्या निवडीमुळे तिकडे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत.

मागील काही दिवसांपासून जय शाह यांच्या निवडीबाबत चर्चा सुरू होती. त्यावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाले आणि त्यांच्यासमोरील पहिल्या मोठ्या चॅलेंजची चर्चाही रंगू लागली आहे. गृहमंत्री म्हणून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अमित शाह रात्रंदिवस एक करत आहेत. आता जय शाह यांनाही तसाच कणखरपणा दाखवावा लागणार आहे.

जय शाहांपुढे कोणतं चॅलेंज?

आयसीसी ही जागतिक क्रिकटेची सर्वोच्च संस्था आहे. या संस्थेचे प्रमुख म्हणून जय शाह यांना क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या सर्वच देशांतील क्रिकेट मंडळासी जुळवून घ्यावे लागणार आहे. पण त्यांच्यासमोर पाकिस्तानचे आव्हान राहणार आहे.

जय शाह 1 डिसेंबरला अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेणार असून त्यानंतर काही महिन्यांतच पाकिस्तानमध्ये चॅंपियन्स ट्रॉफी होणार आहे. भारतीय टीम पाकिस्तानमध्ये जाणार नाही, हे स्पष्टच आहे. मागील काही वर्षांत टीमने पाकिस्तानात एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे यावेळीही मोदी सरकार टीमला पाकिस्तानात जाण्यासाठी परवानगी देणार नाही.

भारतीय टीम पाकिस्तामध्ये गेली नाही तर स्पर्धेवर आणि पर्यायाने पाकिस्तान क्रिकेट मंडळावर संकट ओढवणार आहे. इथेच जय शाह यांची खरी कसोटी लागणार आहे. त्यांना तटस्थ भूमिका घेऊन यातून मार्ग काढावा लागणार आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीकडून पाकिस्तानला भरघोस निधी मिळणार आहे. पण भारताने खेळण्यास नकार दिल्यास श्रीलंका किंवा दुबईमध्ये भारताचे सामने खेळवावे लागतील. असे हायब्रिड मॉडेल एशिया कपमध्येही होते.

जय शाह यांनी हायब्रिड मॉडेलचा मुद्दा पुढे केल्यास पाकिस्तानला नकार देता येणार नाही. भारतीय टीमने पाकिस्तानातच यावे, असा आग्रह पाकिस्तानकडून केला जात आहे. त्यामुळे शाहांना यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT