Teacher  Sarkarnama
देश

Teacher : नवा निर्णय! आता भटकी कुत्री शिक्षकांनी मोजायची? सरकारचा अजब फतवा, नव्या प्लॅनने संतापाची लाट

dog population management : कर्नाटकातील शिक्षकांवर पुन्हा एकदा सरकारने नवी जबाबदारी टाकली असून यावरून नाराजी व्यक्त होत आहे. तर शिक्षकांनी आता काय काय करायचं असा सवाल येथे उपस्थित केला जातोय.

Aslam Shanedivan

  1. सरकार शाळा परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन योजना राबवण्याच्या तयारीत आहे.

  2. या योजनेअंतर्गत सरकारी आणि अनुदानित शाळांमधील प्रत्येकी एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे.

  3. शिक्षकांवर आधीच अनेक सरकारी कामांची जबाबदारी असताना ही नवीन जबाबदारी देण्यावर चर्चा सुरू झाली आहे.

belagavi News : मुलांना दूध-अंडी देण्याची नोंद ठेवा, मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओची जबाबदारी घ्या, यासह इतर सरकारी कामांची जबाबदारी शिक्षकांवर आहे. आता लवकरच कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारतर्फे हाती घेतल्या जाणाऱ्या योजनेसाठी सरकारी आणि अनुदानित शाळेतील प्रत्येकी एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली जाणार आहे.

राज्यात भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या तयारीत असलेल्या सरकारने आता शाळा परिसरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांनाच नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करून कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांच्या परिसरात भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रत्येक शाळेत एका शिक्षकाला नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र शिक्षकांवर विविध सरकारी कामांचा बोजा असल्यामुळे नवीन जबाबदारी शिक्षकांवर देऊ नये अशी मागणी वाढत असतानाच कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाती घेतल्या जाणाऱ्या योजनांची जबाबदारी शिक्षकांना देण्याच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली असून राज्यभरात आधीच शिक्षकांची कमतरता आहे. केंद्र सरकार लवकरच जनगणना सुरू करणार असून त्यातही शिक्षकांना सहभागी व्हावे लागणार आहे.

तसेच एसआयआर सुरू करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचारी कमतरतेच्या परिस्थितीत सरकारच्या अनेक कार्यक्रमांसाठी शिक्षकांची नियुक्ती करावी लागत असल्याने शालेय शिक्षण खात्यावर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांसाठीही शिक्षकांना नोडल अधिकारी बनवण्याचा निर्णय हास्यास्पद असल्याचे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. सरकारकडून नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचा आदेश आल्यानंतर याबाबतची कारवाई केली जाईल.
- रवी बजंत्री, शहर गट शिक्षणाधिकारी
शिक्षकांवर विविध प्रकारच्या सरकारी कामांचा बोजा आहे. त्यामुळे पुन्हा इतर कामांचा बोजा घालू नये. नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्याचा आदेश आल्यानंतर याबाबत सर्वांची मते जाणून घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.
- जयकुमार हेबळी, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघटना

बीएलओ पदाची जबाबदारीही कठीण!

शिक्षक आधीच अनेक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबले आहेत. कर्मचारी कमतरतेमुळे अनेक शाळांमध्ये एकाच शिक्षकावर सर्व कामांची जबाबदारी आहे, तर काही शाळांमध्ये बदलीवर शिक्षक काम करत आहेत. दररोज अनेक अहवाल ऑनलाइन अपलोड करावे लागत असल्याने विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा अहवाल देण्यातच अधिक वेळ जात आहे.

याशिवाय माध्यान्ह भोजन, अंडी आणि केळी वितरणाची जबाबदारीही शिक्षकांवर आहे. बीएलओ पदाची जबाबदारी पार पाडणेही कठीण होते. अशा परिस्थितीत भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठीही शिक्षकांचा वापर करणे कितपत योग्य आहे, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.

FAQs :

1. शिक्षकांना कोणती नवी जबाबदारी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे?
शाळा परिसरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

2. ही योजना कोणत्या शाळांमध्ये लागू होणार आहे?
सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये प्रत्येकी एका शिक्षकाची नियुक्ती केली जाणार आहे.

3. शिक्षकांवर आधी कोणत्या जबाबदाऱ्या आहेत?
दूध आणि अंडी वितरणाची नोंद ठेवणे, मतदार यादी पुनरावलोकनासाठी बीएलओ म्हणून काम करणे यासारख्या जबाबदाऱ्या आधीच शिक्षकांकडे आहेत.

4. या योजनेचा उद्देश काय आहे?
शाळा परिसरातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करणे आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा मुख्य उद्देश आहे.

5. या निर्णयावर प्रतिक्रिया काय आहे?
शिक्षकांवर आधीच कामाचा ताण असल्याने या निर्णयावर चर्चा आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT