Satara News: शिक्षण व्यवस्था हादरली! दहावीच्या उत्तरपत्रिका चक्क सहावीच्या विद्यार्थिनींनी तपासल्या; व्हिडीओ पाहा

Phaltan School News Class 10 Exam Controversy:उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करताना या शिक्षकाने नियम धाब्यावर बसवले आहे. शिक्षकाने दहावीचे पेपर स्वतः तपासण्याऐवजी सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा आरोप होत आहे.
Phaltan School News Class 10 Exam Controversy
Phaltan School News Class 10 Exam ControversySarkarnama
Published on
Updated on

Satara News: दहावी, बारावीच्या पेपर फुटीचं प्रकरण ताजे असतानाच शिक्षण क्षेत्राला हादरुन टाकणारी घटना सातारा जिल्ह्यात घडल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. हा प्रकार घडल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत खेळ केला जात असल्याची भावना पालकांमध्ये आहे. विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीचा मराठीचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतला. या प्रकारामुळे दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

Phaltan School News Class 10 Exam Controversy
UPSC Success Story: बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन

फलटण (ता. सातारा) तालुक्यातील विडणी येथील खासगी शाळेत हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सहावीची विद्यार्थिनी दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका तपासत असल्याचा व्हिडिओमध्ये प्रथमदर्शी दिसत आहे.

याबाबतची तक्रार दिल्यानंतर शिक्षण विभागाचा जिल्ह्यास्तरावरील अहवाल कोल्हापूर विभागाला मिळाला आहे. या विभागाचे अधिकारी उद्या (ता.13) शाळेला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत.

उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करताना या शिक्षकाने नियम धाब्यावर बसवले आहे. शिक्षकाने दहावीचे पेपर स्वतः तपासण्याऐवजी सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा आरोप होत आहे. या धक्कादायक प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. त्यामध्ये संबंधित शिक्षक विद्यार्थिनींच्या मदतीने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासताना दिसत आहे.

Phaltan School News Class 10 Exam Controversy
Farmer Loan Waiver Scheme: शेतकऱ्यांनो, कर्जमाफीचा लाभ घ्यायचायं, तर तातडीने 'ही' नोंदणी करा!

राज्य परीक्षा बोर्ड या बेजबाबदार शिक्षकावर कठोर कारवाई करणार का? असा संतप्त सवाल पालक विचारीत आहेत. सातारा जिल्हा शिक्षण विभाग या प्रकरणाची काय दखल घेणार, काय कारवाई करणार याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

Phaltan School News Class 10 Exam Controversy
Nashik Housing Scandals: अधिकाऱ्यांची अजब कारवाई! बिल्डर सोडून जमिनीवर गुन्हा दाखल; शंभूराजे देसाई भडकले

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com