Karnatak News : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने गेल्या 18 वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवत आयपीएल 2025 च्या विजेतेपदाच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयानंतर सर्वत्र आरसीबीच्या चाहत्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. पण बेंगळुरु येथे आरसीबीच्या खेळाडूंच्या सत्कार समारंभावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांना जीव गमवावा लागला. या घटनेप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
कर्नाटक सरकारने (Karnataka Government ) आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर 4 जून रोजी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. राज्य सरकारने दुर्घटनेनंतर पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे. यात पोलीस आयुक्तांव्यतिरिक्त,अतिरिक्त पोलिस आयुक्त,मध्य विभागाचे डीसीपी,एसीपी,क्यूबन पार्क पोलिस स्टेशनचे निरीक्षक, स्टेशन हाऊस ऑफिसर आणि क्रिकेट स्टेडियमचे प्रभारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचं जाहीर केलं आहे.
आरसीबीच्या विजयी जल्लोषाला बेंगळूरू येथील चेंगराचेंगरीच्या घटनेनं गालबोट लागलं होतं.या घटनेप्रती देशभरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेला राज्य सरकारसह पोलिस प्रशासनालाही जबाबदार धरत थेट मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.
आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. तसेच या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना सरकार आणि आरसीबीकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
बेंगळूरू येथील चेंगराचेंगरीचं प्रकरण चांगलंच भोवलं आहे. कर्नाटक सरकारने स्टेडिययम बाहेर एकीकडे घडलेल्या दुर्घटनेनंतरही दुसरीकडे जल्लोषात सत्कार समारंभ सुरुच ठेवला होता. यामुळे समाजात सरकारविरोधात तीव्र संतापाची लाट उसळली होती. अखेर सरकारनं याप्रकरणी कठोर पाऊल उचललं आहे.
बेंगळुरुतील चेंगराचेंगरीचं प्रकरण तत्काळ हायकोर्टात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुरुवारी आरसीबीची संघाच्याविरोधात FIR देखील दाखल करण्यात आली आहे. आता याप्रकरणी आरसीबीविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. बुधवारी (ता.4) आरसीबीच्या खेळाडूंना आयपीएल ट्रॉफी पाहण्यासाठी चाहत्यांनी जोरदार गर्दी केली.
बेंगळुरुच्या च़िन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीचे खेळाडू येणार असल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी तिथे तुफान गर्दी केली होती. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात चाहते दाखल झाल्यानं एकच गोंधळ उडाला. पोलिसांनाही नेमकं काय करायचं हे समजायला मार्ग नव्हता. कारण चिन्नास्वामी स्टेडियमची आसन क्षमता ही 35 हजार लोकांची आहे. पण त्यावेळी जवळपास 2-3 लाख लोकं जमली होती. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज केला आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची दु:खद घटना घडली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.