Benjamin Netyanahu: इराणच्या हल्ल्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पण नुकताच त्यांचा एक कॉफी पितानाचा ताजा व्हिडिओ समोर आल्यानं या चर्चांना पूर्ण विराम मिळाला होता. पण आता पुन्हा एकदा त्यांच्या मृत्यूच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याच कारण म्हणजे हा व्हायरल व्हिडिओ खरा नसून फेक असल्याचा दावा ट्विटरचं AI टूल ग्रोकनं केला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. आता इस्रायलला पुन्हा एकदा ग्रोकचा हा दावा खोडून काढावा लागणार आहे.
नेत्यानाहू यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून १ मिनिटाच्या या व्हिडिओत नेत्यानाहू एका कॉफी शॉपमध्ये दिसत आहेत. काऊंटरवरुन त्यांनी एक कप कॉफी घेत ती पिताना दिसताहेत. हे करत असताना ते म्हणतात की, मी कॉफीसाठी मेलो आहे. केवळ एकच मिनिटाचा हा व्हिडिओ आहे, पण नेत्यानाहू यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्यानंतर हा व्हिडिओ आल्यानं या चर्चांना ब्रेक लागेल असं वाटत असतानाच @meenajanbetani नामक एका युजरनं एक्स अर्थात ट्विटरच्या AI टूलला अर्थात ग्रोकला व्हिडिओ शेअर करत प्रश्न विचारला की, हे खरं आहे का?
तर ग्रोकनंही या व्हिडिओबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ डिपफेक कसा आहे? याचं स्पष्टीकरणही ग्रोकनं दिलं आहे. ग्रोकनं म्हटलं की, नाही! हा व्हिडिओ खरा नाही. हा एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओ आहे. नेतन्याहूच्या अधिकृत अकाउंटने तो व्यंग्य/विनोद म्हणून पोस्ट केला आहे (कॅप्शनमध्ये ते म्हणतात, "मी कोण आहे?") हा व्हिडिओ इराण संघर्षादरम्यान नेत्यानाहू यांच्या मृत्यूच्या अफवा थांबाव्यात यासाठी तयार करण्यात आल्याची शक्यता आहे.
हा व्हिडिओ डिपफेक असल्याची कारणं म्हणजे, नेत्यानाहूंच्या हातातल्या कपातील कॉफी ही स्थिर पातळीवर आहे. त्याचबरोबर त्यांचं बोलतनाचं अनैसर्गिक लिप सिंक होत असून सहज चर्चा (स्लँग टर्ममध्ये ऑप्स) यासारख्या चिन्हे हा व्हिडिओ खोटे असल्याची पुष्टी करतात, असंही ग्रोकनं म्हटलं आहे.
इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांचा इराणच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता. पण इस्रायलकडून सोशल मीडियातून केले जाणारे हे दावे फेटाळून लावले आहेत. नेत्यानाहू यांच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शुक्रवारी शेअर केला यामध्ये ते सध्याच्या युद्धाच्या स्थितीवर बोलताना दिसत आहेत. त्याचबरोबर एका पत्रकार परिषदेला संबोधित करतानाही ते दिसत आहेत. यामध्ये त्यांनी हात उंचावला असताना त्यांच्या हाताला सहा बोटं असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचा दावाही करण्यात आला. या सहा बोटांमुळेच त्यांचा खरोखरच मृत्यू झाला असल्याची चर्चा सुरु झाल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर आज पुन्हा त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये ते कॉफी पिताना दिसत आहेत. पण आता हा व्हिडिओ देखील फेक असल्याचा दावा ग्रोकनं केल्यानं पुन्हा खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.