Rajya Sabha Election : भाजपच्या घोडेबाजाराचा धसका; ओडिशातील काँग्रेस आमदारांना सुरक्षित बंगळूरमध्ये हलविले

Odisha Congress MLA In Karanataka : भाजपच्या कथित घोडेबाजाराच्या भीतीने काँग्रेसने ओडिशातील आठ आमदारांना कर्नाटकमधील बंगळूरजवळील रिसॉर्टमध्ये हलवले. फोडाफोडीच्या राजकारणाला अटकाव करण्यासाठी काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.
Congress MLA
Congress MLASarkarnama
Published on
Updated on

Bengaluru, 14 March : भारतीय जनता पक्षाच्या कथित घोडेबाजाराच्या भीतीने ओडिशा काँग्रेसने आपल्या काही आमदारांना पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. काँग्रेस पक्षाचे हे आठ आमदार सध्या बंगळूरपासून सुमारे ३५ किमी अंतरावरील एका रिसॉर्टमध्ये थांबलेले आहेत. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अटकाव करण्यासाठी काँग्रेसने हे पाऊल उचलले आहे.

ओडिशात राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे. पण, पाच उमेदवार रिंगणात आहेत. ओडिशाच्या १४७ सदस्यीय विधानसभेत भाजपकडे ७९ आमदार आणि तीन अपक्षांचा पाठिंबा मिळून ८२ मते आहेत. बिजू जनता दलाला (बीजेडी) एक जागा निश्चित मिळू शकते. चौथ्या जागेसाठी आवश्यक असलेली ३० पहिल्या पसंतीची मते कोणत्याही पक्षाकडे नाहीत.

बीजेडीने संतृप्त मिश्रा आणि दत्तेश्वर होता यांना उमेदवारी दिली आहे. होता यांना काँग्रेस पक्षाचा (Congress)पाठिंबा आहे. भाजपने मनमोहन सामल आणि सुजित कुमार यांना उमेदवारी दिली आहे. तसेच, अपक्ष दिलीप रे यांनाही पाठिंबा दिला आहे. बीजेडी-काँग्रेसने भाजपला तीन जागा जिंकण्यापासून रोखण्यासाठी वेगवेगळी समीकरण राबविण्याचा प्रयत्न चालवला आहे.

पाच उमेदवार रिंणगात उतरल्याने राज्यसभा निवडणुकीत क्रॉस-व्होटिंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन ओडिशा काँग्रेसने आपत्कालीन बैठक घेऊन सर्व १४ आमदारांना भुवनेश्वरला बोलावले होते. त्यानंतर मुख्य प्रतोद सी. एस. राझेन एक्का यांच्यासह आठ आमदारांना बंगळूरला हलविण्यात आले.

Congress MLA
BJP leader : निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का! ३ वेळा आमदार राहिलेल्या बड्या नेत्याचा राजीनामा; बालेकिल्ला धोक्यात!

काँग्रेस पक्षाचे उर्वरित सहा आमदार सध्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी भुवनेश्वरमध्येच आहेत. काँग्रेसचे आठ आमदार आठवडाभर कर्नाटकात राहतील आणि थेट राज्यसभा निवडणुकीसाठी ओडिशामध्ये परत जातील, असे काँग्रेस नेते रामचंद्र कदम यांनी सांगितले.

Congress MLA
Gopichand Padalkar : आटपाडीतील पहिल्या IPS तरुणाची हत्तीवरून मिरवणूक; आमदार पडळकरांनी वाटली साखर

ते आमदार आमचे पाहुणे

ओडिशातील आमदार स्वतः बंगळूरला आले आहेत. ‘त्यांनी आरामात राहण्यासाठी जागा मागितली; म्हणून व्यवस्था केली आहे. ते आमचे पाहुणे आहेत’, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. पक्षाने या संदर्भात कोणतीही विशेष जबाबदारी दिलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com