CM Bhagwant Mann Sarkarnama
देश

Chief Minister news : धक्कादायक : मुख्यंमत्री मद्यप्राशन करून पोहोचले विधानसभेत? सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व्हिडीओच दाखविला... 

Bhagwant Mann controversy : आपमधून नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

Rajanand More

CM Mann allegations : मागील काही दिवसांत पंजाबमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील आम आदमी पक्षाच्या सहा खासदारांसह एकूण सात जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाला जोरदार हादरा बसलेला आहे. त्यातच आता सर्व विरोधी पक्षांनी थेट मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याविषयी धक्कादायक दावा केला आहे.

पंजाबमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मान यांनी आज कामगार दिनाचे औचित्य साधत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मान यांनी भाषण केले. या भाषणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काँग्रेस, अकाली दलासह भाजपच्या अनेक नेत्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत मान हे मद्यप्राशन करून विधानसभेत आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत मान यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी तर थेट मान यांच्या अल्कोहोल चाचणीची मागणी केली. मान यांच्यावर गंभीर आरोप झाल्याने सत्य बाहेर यायला हवे. त्यांची अल्कोहोल चाचणी करणे गरजेचे आहे. सर्व आमदारांचीही चाचणी करावी, असेही बाजवा म्हणाले.

शिरोमणी अकाली दलानेही मान यांच्या आरोप करताना ते मद्यप्राशन करून विधानसभेत आल्याचे म्हटले आहे. मान यांची डोप टेस्ट करण्याची मागणी पक्षाने केली आहे. भाजपनेही मान यांच्या मद्यप्राशन केल्याचा थेट आरोप केला आहे. आज कामगारांच्या नावावर अधिवेशन बोलवले आहे. पण कामगारांबाबत मुख्यमंत्री किती गंभीर आहेत, हे यावरून दिसते, अशी टीका भाजपने केली आहे.

आपमधून नुकत्याच भाजपमध्ये गेलेल्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनीही मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज पुन्हा एकदा पंजाबचे मुख्यमंत्री भगवतं मान हे लोकशाहीच्या मंदिरात मद्यप्राशन करून पोहोचले.हा व्यक्ती गुरूद्वारा, मंदिरात मद्यप्राशन करून जातो. लोकसभेत मद्यप्राशन करून येत होते.सरकारी बैठकीत मद्यप्राशन करून जातो. परदेशात इतके मद्यप्राशन केले की विमानातून उतरविण्यात आले, अशी टीका मालीवाल यांनी केली आहे.

निवडणुकीआधी त्यांनी आपल्या आईच्या डोक्यावर हात ठेऊन ‘मी आता मद्यप्राशन करणार नाही.’असे म्हटले होते. पंजाबसारख्या संवेदनशील सीमा असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री नेहमी मद्यप्राशन केलेले असतात. नशेतच फाईलवर सही करतात. जी व्यक्ती मद्यापासून केवळ झोपेवेळीच दूर असते, ती व्यक्ती पंजाब कसे चालवू शकते? मुख्यमंत्री मान यांची अल्कोहोल चाचणी व्हायला हवी आणि दोषी आढळून आले तर मुख्यमंत्रिपदावरून बरखास्त करायला हवे, अशी मागणी मालीवाल यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT