Bhagwant Mann Sarkarnama
देश

भगवंत मान यांनी 122 माजी खासदार-आमदारांना दिला पहिला दणका

आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान हे येत्या बुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

चंदीगड : आम आदमी पक्षाचे (आप) मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) हे येत्या बुधवारी (16 मार्च) दुपारी 12.30 वाजता पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण त्याआधीच त्यांनी माजी आमदार-खासदारांना जोरदार झटका दिला आहे. राज्यातील व्हीआयपी कल्चर संपवण्यासाठी पहिलं पाऊल टाकत त्यांनी 122 माजी खासदार-आमदार व इतर व्हीआयपी लोकांची सुरक्षा काढण्याच्या आदेशावर त्यांनी सही केली आहे.

मान यांनी शनिवारी याबाबतचे आदेश काढले. सुरक्षा काढण्यात आलेल्या नेत्यांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस (Congress) व अकाली दलाच्या नेत्यांचा समावेश आहे. पण यामधून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) आणि चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्यासह बादल कुटुंबियांना वगळण्यात आलं आहे. त्यांना केंद्र सरकारच्या सुचनेनुसार सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आल्यानं हा निर्णय घेण्यात आले आहे. मान यांनी नेत्यांच्या सुरक्षेवर होणाऱ्या खर्चावर बोट ठेवलं होतं.

म्हणाले म्हणाले होते की, एककीडे पोलीस ठाण्यांमध्ये जागा रिक्त आहेत. तर दुसरीकडे नेत्यांना सुरक्षा दिली जात असून त्यासाठी त्यांच्या घराबाहेर टेंट टाकले आहेत. आम्ही पोलिसांवरील ताण कमी करू. साडे तीन कोटी लोकांची सुरक्षा महत्वाची आहे. दरम्यान, चरणजितसिंग चन्नी यांनीही मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपली सुरक्षा कमी करण्याचा निर्णय़ घेतला होता.

दरम्यान, मान यांनी शनिवारी राज्यपालांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला. त्यानुसार ते बुधवारी दुपारी 12.30 वाजता भगतसिंग यांचे मूळ गाव असलेल्या खटकर कलान येथे शपथ घेणार आहेत. पंजाब सरकारमध्ये मंत्रीपदासाठी हरपाल सिंग चीमा, अमन अरोरा, बलजिंदर कौर, सर्वजीत कौर मनुके, गुरमीत सिंग मीत हेअर, बुध राम, कुंवर विजय प्रताप सिंग, जीवनज्योत कौर आणि डॉ, चरणजीत सिंग यांच्यासह अनेक आप आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.

भगवंत मान यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केले आहे. भगवंत मान यांनी वेणू प्रसाद यांची प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. वेणू प्रसाद हे १९९१ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. रविवारी (१४ मार्च) भगवंत मान आणि केजरीवाल दोघेही सुवर्ण मंदिर, दुर्गियाना मंदिर आणि श्री राम तीरथ मंदिराला भेट देतील. अमृतसरमध्ये 'आप'च्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी ते एका रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. 117 सदस्यीय विधानसभेत आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकल्या आहेत. गेली 5 वर्षे सरकार चालवणाऱ्या काँग्रेसला केवळ 18 जागा मिळाल्या. दुसरीकडे बसपाला 1 जागा, भाजपला 2, शिरोमणी अकाली दलाला 3 आणि अपक्षांना एक जागा मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT