Rahul Gandhi Sarkarnama
देश

Bharat Jodo Nyay Yatra: 'न्याय यात्रे'चा ताफा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला; राहुल गांधींनी स्मित हास्य करत दिला फ्लाइंग किस

Ganesh Thombare

Assam News: खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरु असून ही 'न्याय यात्रा' सध्या आसाममध्ये पोहचली आहे. मात्र, आसाममध्ये आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना समोर आली. तर राहुल गांधी यांचाही ताफा अडवत मोदी-मोदींच्या घोषणा देण्यात आल्या.

राहुल गांधींची (Rahul Gandhi) 'भारत जोडो न्याय यात्रा' आसाममधील सुनीतपूर भागातून प्रवास करत आहे. यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला. तसेच मोदी- मोदींचे नारे दिले. यानंतर राहुल गांधी हे बसमधून उतरल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मात्र, तेथील गर्दी पाहता सुरक्षारक्षकांनी लगेचच राहुल गांधी यांना पुन्हा बसमध्ये बसवलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी मोदी-मोदींचे नारे सुरु असताना बसमधून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्मित हास्य करत जमावाला फ्लाइंग किस दिला. राहुल गांधींनी 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये "मोहब्बत की दुकान खुली है, जुडेगा भारत, जीतेगा हिंदुस्थान", असं म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्यानंतर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा हल्ला भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

जयराम रमेश यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं ?

"काही मिनिटांपूर्वी माझ्या वाहनावर जुमुगुरिहाट, सुनीतपूर येथे भाजपच्या एका जमावाने हल्ला केला. या बरोबरच गाडीवरील 'भारत जोडो न्याय यात्रे'चे स्टिकर्स देखील फाडले आहेत. यावेळी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या", असं जयराम रमेश यांनी म्हटलं. तसेच आम्ही संयम राखला आणि शांतपणे पुढे निघून गेलो. मात्र, आम्ही घाबरलो नसून यापुढे लढत राहू, असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT