अखेर बंडखोर आमदारांना आसाम पुरग्रस्तांची झाली आठवण; बैठकीत मदतीचा आकडा ठरला

मागील आठ दिवसांपासून सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीतील आलिशान हॉटेलमध्ये आहेत.
Eknath Shinde Latest News, Assam Flood News
Eknath Shinde Latest News, Assam Flood NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मागील आठ दिवसांपासून गुवाहाटातील आलिशान हॉटेलमध्ये राहणाऱ्या बंडखोर आमदारांना अखेर बुधवारी आसाममधील पुरग्रस्तांची आठवण झाली. आसामधील भीषण पुरामुळे आतापर्यंत 20 लाखांहून अधिक नागरिकांना मोठा फटका बसला आहे. हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. यापार्श्वभूमीवर हे बंडखोर आमदार गुवाहाटीत राहिल्याने त्यांच्याविरोधात रोष व्यक्त केला जात होता. (Maharashtra Political Crisis)

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर आंदोलन करत निषेध केला होता. तसेच काँग्रेसनंही या आमदारांना आसामबाहेर जाण्याची विनंती केली होती. आमदारांचे हॉटेलमधील अनेक व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत होते. तसेच राज्य सरकारकडून हॉटेलबाहेर मोठी सुरक्षा यंत्रणाही उभी करण्यात आली आहे.

Eknath Shinde Latest News, Assam Flood News
बहुमत चाचणी होणार? सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तीवाद; पाच वाजता होणार फैसला

अखेर राज्यपालांनी गुरूवारी महाविकास आघाडी सरकारला बहुमत बहूमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिले आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासह गुवाहाटीत असलेले सर्व 49 आमदार गुरूवारीच मुंबईत येणार आहेत. त्याआधी या सर्व आमदारांची बुधवारी सकाळी हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत पुरग्रस्तांना मदत करण्याची भूमिका घेतली.

एकनाथ शिंदे यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती ट्विटरवरून दिली. आसाम मधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसेच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत 51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा गट उद्या (३० जून) मुंबईत येणार आहेत. ही माहिती स्वत: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली. पण आजच ते गोव्याकडे रवाना होणार आहेत. सुरूवातीला सूरत आणि नंतर गुवाहाटी गाठलेले हे आमदार आता गोव्यात जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

Eknath Shinde Latest News, Assam Flood News
शिरगणती, व्हिडीओ शुटींग..! राज्यपालांनी घेतलीय पुरेपूर काळजी; काय म्हटलंय आदेशात?

एकनाथ शिंदे व तीन-चार आमदार वगळून इतर सर्व आमदार गुवाहाटीतून निघण्यापूर्वी कामाख्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. तिथून ते थेट विमानतळावर जातील. त्यासाठी दोन बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. विमानतळावरून या आमदारांना गोव्याला नेले जाणार आहे.

गोव्यात त्यांच्यासाठी ताज रिसॉर्ट 70 खोल्या बुक करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर हे आमदार गुरूवारी सकाळी गोव्यातून मुंबईत दाखल होतील, असं सांगितलं जात आहे. बंडखोर आमदारांविरोधात सुरू असलेल्या शिवसैनिकांच्या आंदोलनामुळे ही दक्षता घेण्यात आल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com