Bharat Jodo Nyay Yatra Sarkarnama
देश

Bharat Jodo Nyay Yatra: 'भारत जोडो न्याय यात्रे'त राडा; काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला

Congress leader Jairam Ramesh: या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Ganesh Thombare

Assam News: काँग्रेसचे नेते, खासदार राहुल गांधी यांनी 14 जानेवारीपासून 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याला अर्थात 'भारत जोडो न्याय यात्रे'ला मणिपूरमधून सुरूवात केली. सध्या काँग्रेसची ही 'न्याय यात्रा' आसाममध्ये पोहचली आहे. ही न्याय यात्रा आसाममध्ये आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे काही वेळ येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर हा हल्ला भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधींची (Rahul Gandhi) 'भारत जोडो न्याय यात्रा' आसामच्या सुनीतपूर भागातून प्रवास करत आहे. यावेळी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे (Congress) नेते जयराम रमेश यांच्या गाडीवर हल्ला केला. जयराम रमेश यांची गाडी अडवत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेचा व्हिडिओ जयराम रमेश यांनी 'एक्स'वर शेअर केला आहे.

जयराम रमेश यांचं ट्वीट काय ?

"काही मिनिटांपूर्वी माझ्या वाहनावर जुमुगुरिहाट, सुनीतपूर येथे भाजपच्या एका जमावाने हल्ला केला. या बरोबरच गाडीवरील 'भारत जोडो न्याय यात्रे'चे स्टिकर्स देखील फाडले आहेत. यावेळी त्यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या विरोधात घोषणा दिल्या", असं जयराम रमेश यांनी म्हटलं. तसेच आम्ही संयम राखला आणि शांतपणे पुढे निघून गेलो. मात्र, आम्ही घाबरलो नसून यापुढे लढत राहू, असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT