Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra  Sarkarnama
देश

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींसाठी काय पण.., राजकीय लाभाचे पद नसतानाही शेतकऱ्याचे असेही प्रेम !

सरकारनामा ब्युरो

Bharat Jodo Yatra rahul gandhi : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासाठी विदर्भातील शेतकरी काहीही करायला तयार असल्याची प्रचिती भारत जोडो यात्रेत बाळापूर (जि. अकोला) येथे पदोपदी येत आहे. (Bharat Jodo Yatra rahul gandhi news update)

राहुल गांधी यांचा मुक्कामासाठी हागे नावाच्या एका शेतकऱ्याने आपल्या १० एकरमधील तुरीच्या पिकावर नांगर फिरवला. हागे एक सामान्य शेतकरी आहेत. शेती हेच त्यांच्या कुटुंबियांसाठी पोटापाण्याचे साधन आहे. ते सधन शेतकरीसुद्धा नाहीत. काँगेसचे जुने कार्यकर्ते एवढीच त्यांची ओळख. आजवर कुठल्याच पदावर नव्हते. राजकीय लाभाचे पदही त्यांच्या नशिबाला लाभले नाही.

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मार्ग निश्चित झाला तेव्हा त्यांचा मुक्काम कुठे ठेवायचा याची चिंता सर्वांना पडली होती. यात्रे दरम्यान राहुल गांधी फाईव्ह स्टार हॉटेल किंवा कोणा नेत्यांच्या घरी थांबत नाही. वाटेत डोंब टाकले जातात तिथेच ते मुक्काम करतात. त्यामुळे जागेची शोधशोध सुरु झाली. नेमकी जागा सापडत नव्हती. नागपूरचे नगरसेवक प्रफुल गुडधे यांच्यावर काँग्रेसने जबाबदारी सोपावली. त्यांनी अकोला बाळापूर मार्गावर १० चकरा मारल्या. त्या दरम्यान हागे यांच्यासोबत त्यांची भेट झाली. त्यांना अडचण सांगितली. ती हागे यांनी क्षणात दूर केली.

कुठल्याही फायद्या तोट्याच्या विचार न करता उभ्या पिकावर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली. राहुल गांधी आपल्या शेतावर थांबणार आहे हीच आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. लगेच नांगार फिरवायला सुरुवात केली. बाळापूर येथील रपटा या गावात हागे यांची १० एकर शेती आहे. तुरीचे पिक ते घेतात. राहुल गांधी आपल्या शेतावर थांबले हेच आपल्यासाठी काँग्रेसने दिलेले मोठे पद असल्याची भावना हागे यांनी व्यक्त केली.

आज राहुल गांधी यांची सभा

भारत जोडो यात्रे दरम्यान आज (शुक्रवारी) शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा होत आहे, या सभेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. राहुल गांधींच्या विरोधात मनसे स्टाईलने 'खळखट्याक'होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनसैनिकांनीही आज मोठ्या संख्येने शेगावात दाखल होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. "शेगावात जाऊन राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवा," असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT