MNS : 'राहुल गांधी-सावरकर' प्रकरणात मनसेची उडी ; शेगावच्या सभेत 'खळखट्याक' होणार ?

MNS : "शेगावात जाऊन राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवा," असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
MNS
MNS Sarkarnama

MNS : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. भाजपसह ठाकरे गटाने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या प्रकरणात उडी घेतली आहे.

भारत जोडो यात्रे दरम्यान उद्या (शुक्रवारी) शेगाव येथे राहुल गांधी यांची सभा होत आहे, या सभेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवा, असा आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. राहुल गांधींच्या विरोधात मनसे स्टाईलने 'खळखट्याक'होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनसैनिकांनीही उद्या मोठ्या संख्येने शेगावात दाखल होण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. "शेगावात जाऊन राहुल गांधींना काळे झेंडे दाखवून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवा," असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

MNS
Rahul Gandhi : सावरकरांचा माफीनामा राहुल गांधींनी वाचून दाखवला ; फडणवीस, भागवतांनाही टोमणा

भारत जोडो यात्रेनिमित्त राहुल गांधी उद्या शेगावात दाखल होणार आहेत. आज राहुल गांधी यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेतली. सावरकरांबाबत केलेल्या विधानावर ठाम असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सावकरांनी इंग्रज सरकारला लिहिलेलं पत्र त्यांनी माध्यमासमोर वाचून दाखवलं.

"राहुल गांधी यांचे सावरकरांबद्दलचे वक्तव्य चूकच आहे. त्यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. मात्र, आमची भूमिका विचारणारे तुम्ही कोण. तुमचीही कुंडली काढा की, स्वातंत्र्यलढ्यात तुमचे कोण होते, असा खडा सवाल आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपला केला.

ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार संजय राऊत उपस्थित होते. देशाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. आपली हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात ते पोलिसात तक्रार देणार आहेत. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. रणजीत सावरकर यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com