Bharat Jodo Yatra :
Bharat Jodo Yatra : Sarkarnama :
देश

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी चढले बसच्या टपावर, व्हिडीओ तूफान व्हायरल!

सरकारनामा ब्यूरो

गोलापल्ली (तेलंगण) : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. भारत जोडो यात्रा सध्या तेलंगणामध्ये आहे, ही यात्रा लवकरच आता महाराष्ट्रात पोहचणार आहे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला आता जवळपास 55 दिवस पूर्ण होत आहेत. सध्या या यात्रेने तेलंगणातल्या गोलापल्ली जिल्ह्यातून प्रवासाला सुरुवात केली. या दरम्यान राहुल गांधींचे वेगळे रूप दिसले. राहुल गांधी एका प्रवासी बस वाहनाच्या टपावर चढताना दिसले.

तेलंगणात भारत जोडो यात्रा पोहचली असताना राहुल गांधी यांनी या यात्रेदरम्यान एका प्रवासी बसच्या टपावर चढले. बसच्या मागे असलेल्या शिडीच्या साहाय्याने राहुल गांधी बसच्या टपावर चढताना दिसले. यावेळी बसच्या टपावर काही तरूण आधीच चढलेले होते. यासंबंधीचा व्हिडीओ त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंट वरून शेअर केला आहे.

या व्हिडिओसोबत त्यांनी लिहले आहे की, "आम्ही देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवासाला निघालो आहोत, फक्त देशातील लोकांचे म्हणणे ऐकण्यासाठी. काही पावले आम्ही उचलू, अधिक उंची निश्चित गाठू, परंतु तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते ऐकूनच पुढे जाऊ."

दरम्यान, राहुल गांधींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. राहुल गांधींचा वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांच्या शारीरीक तंदरूस्तीचा, त्यांच्या फिटनेसचा या निमित्ताने चर्चा होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेकांनी शेअर केला आहे. दरम्यान ही यात्रा लवकरच महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT