Gujrat Politics| गुजरात निवडणुकीपुर्वी शहांचा डाव, केली मोठी घोषणा

Gujrat Politics| आगामी गुजरात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शहा यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
Amit Shaha | BJP|
Amit Shaha | BJP|
Published on
Updated on

Gujrat Politics| नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी मोठा निर्णय़ घेतला आहे. अमित शहा यांनी गुजरातच्या आणंद, मेहसाणा या सीमेवरील जिल्ह्यातील बांगलादेशी, शीख आणि ख्रिश्चन नागरिकांंना नागरिकत्व देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आगामी गुजरात निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री शहा यांनी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

गुजरात निवडणुकीआधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील आणंद आणि मेहसाना जिल्ह्यात राहणाऱ्या अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन नागरिकांना नागरिकत्व देण्याता आदेश दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (सीएए) अंतर्गत दिले जाणार नसून नागरिकत्व नागरिकत्व कायदा, १९५५ अंतर्गत दिले जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना त्यासंबंधी अधिकार देण्यात आले आहेत. ‘सीएए’कायद्यातही पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून आलेल्या आणि गुजरामध्ये वास्तव्यास असलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिश्चनांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण केंद्र सरकारने अद्याप यासंबंधी नियमावली तयार केली नसल्याने कोणालाही त्याच्या अंतर्गत नागरिकत्व दिलं जात नाही.

Amit Shaha | BJP|
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आज फैसला होणार?

गुजरातमधील या दोन जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या या लोकांना ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज दाखल करावा लागेल. जिल्हाधिकारी अर्जाची छाननी करुन अर्जाहसित संबंधिताचा अहवाल केंद्राकडे सोपवतील. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित नागरिकांना आणि यासंबंधीचं प्रमाणपत्रही दिलं जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com