Bharat Jodo Yatra : Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Bharat Jodo Yatra : काँग्रेसने 'भारत जोडो' यात्रेतून नेमकं काय मिळवलं?

Bharat Jodo Yatra : यात्रा संपली नाही, आता नवी सुरूवात झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Bharat Jodo Yatra : भारत जोडो या काँग्रेसच्या यात्रेने देशाला प्रेमाचा, बंधुभावाचा संदेश दिला. यात्रेने देशाला एक वेगळा मार्ग दाखवला. भाजप आणि संघाचा हा द्वेष आणि तिरस्काराचा अजेंडा राबवला आणि मात्र आम्ही प्रेम आणि बंधुभावाचा संदेश घेऊन ही यात्रा देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत घेऊन आलो, असे राहुल गांधींनी म्हंटले आहे.

भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने देशापुढे दोन पर्याय आहे. एक पर्याय म्हणजे लोकांना जाती-जातीत, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून द्वेष आणि तिरस्काराचं राजकारण आणि आमचा मार्ग म्हणजे लोकांना जोडणारा मार्ग, भारताला जोडणारा मार्ग, भारत जोडो मार्ग. आमच्या या दीर्घ यात्रेचा एकूणच काय परिणाम होईल ये आताच सांगता येणारं नाही. आमची यात्रा अंतिम टप्प्यात असली तरी, ही यात्रा संपलेली नाही, संपणार नाही. आता एक नवी सुरूवात होत आहे.

ही एक नवी एक सुरूवात आहे असं राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये म्हंटले आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांना आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. या यात्रेने द्वेषावर मात करत भारताला जोडले आहे. भारताची पुढील वाटचाल कशी असावी, हा संदेश भारते जोडो यात्रेने देशाला दिला आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

अनेक प्रश्न घेऊन यात्रेत उतरलो :

भारताला अनेक प्रश्नांनी आज अनेक प्रश्नांनी घेरले आहे. दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या स्मस्या,काश्मिरी पंडितांचा प्रश्न, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. कलम ३७० यावर राहुल गांधींनी आपली भूमिका स्पष्ट केली. "पक्षाच्या कार्यकारिणीत आमची यावरची भूमिका काय आहे, त्यात ते आम्ही स्पष्ट केले आहे, असं गांधी म्हणाले.

"आता यात्रा संपली असं समजू नका, आज श्रीनगरमध्ये यात्रा संपली आहे. माझ्यासोबत अनेक लोक अनेक चालले. आमची भारत जोडो यात्रा दक्षिणेतून निघून उत्तरकडे गेली. मात्र आमच्या या यात्रेचा परिणाम एकूणच सगळ्या देशावर घडून आला. कारण, याबाबत आम्ही एक नवं व्हिजन, एक दृष्टी देशाला दिला, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या अनेक नेते व कार्यकर्ते यांनी इतरही राज्यांमध्ये यात्रा काढून पाठबळ दिले. भारत जोडो यात्रेचा आणखी दुसरा भाग असेल का? हे आताच्या क्षणाला सांगता येणार नाही. मात्र याबाबतीत माझ्याकडे काही कल्पना आहेत. देशातले विविध राजकीय पक्ष आणि नागरिक यांच्यात काहीसं अंतर पडत गेलं आहे. हेच अंतर कमी व्हावं, या उद्देशानेच भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. रस्त्यावरून चालत आपण प्रत्यक्ष लोकांना भेटू शकतो, आपण त्यांच्यातलेच एक होऊ शकतो, असा अनुभव आहे. देशाला आता एका वेगळ्या राजकीय दृष्टीकोनाची आवश्यकता आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT