Odisha Health Minister Naba Das : ओडिशाचे आयोग्यमंत्री नाबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Odisha Health Minister Naba Das : गोळीबारात जखमी झाले होते...
Odisha Health Minister Naba Das
Odisha Health Minister Naba DasSarkarnama

Odisha Health Minister Naba Das : ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा किशोर दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी एकाने मंत्र्यांवर गोळ्या झाडल्या होत्या. नबा दास हे ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता.

जखमी अवस्थेत त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले होते. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन नब किशोर दास यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. अपोलो रुग्णालयाकडून एक निवेदन जारी करण्यात आले होते. ज्यामध्ये छातीच्या डाव्या बाजूला गोळी लागल्याचे सांगण्यात आले होते.

Odisha Health Minister Naba Das
Marathwada Teacher Constituency : शिक्षक आमदारासाठी ६१ हजार गुरुजी करणार मतदान..
Odisha Health Minister Naba Das
Pune By-Election : कसबा-चिंचवडमध्ये भाजपची सावध खेळी : आघाडीनंतरच उमेदवार जाहीर करणार!

डॉ. देबाशिष नायक यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तात्काळ उपचार करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली होती. मात्र, ऑपरेशनमध्ये त्यांच्या अंगात गोळी घुसल्याचे आढळून आले. त्यामुळे हृदयाला आणि डाव्या फुफ्फुसाला दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात अंतर्गत रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांचे निधन झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com