Cockroach Janata Party | Abhijeet Dipke | Viral Movement Sarkarnama
देश

Abhijit Dipke Appeal : अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवताच केलं आवाहन, म्हणाले, 'तिरंगा अन् पुस्तक ...'

Cockroach Janata Party Protest Jantar Mantar : काॅक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांचे भारतात आगमन झाले आहे. विमानतळावर उतल्यानंतर आंदोलकांसाठी त्यांनी आवाहन केले आहे.

Roshan More

Cockroach News : कॉक्रोच जनता पार्टीकडून आज आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे आज सकाळी साडेसात वाजता दिल्ली विमानतळावर पोहोचले. भारतात पाऊल ठेवताच त्यांनी मोठे आवाहन केले.

'मी सर्वांना जतंर मंतर येथे भेटण्यास उत्सुक आहे. पुस्तक आणि आपला तिरंगा सोबत आणायला विसरू नका, करुणा आणि कृतज्ञतेची भावना म्हणून पोलिसांना फुले द्यायला विसरू नका', असे आवाहन त्यांनी केली. आपल्याला ही चळवळ प्रेम आणि शांततेने पुढे न्यायची आहे, असे देखील त्यांनी म्हटले.

दीपके यांचे भारतात आगमन झाल्यानंतर त्यांना अज्ञातस्थळी नेल्याची अफवा देखील पसरली होती. मात्र, जंतरमंतरवर आंदोलनासाठी पोलिसांनी आपल्याला परवानगी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्वांनी जतंर मंतर येथे जमण्याचे आवाहन देखील केले.

ते म्हणाले, आपल्या पोलिसांनी परवानगी दिली आहे. जंतर मंतरवर काॅक्रोच जमा होत आहेत.सर्व काॅक्रोचनी थेट जंतर मंतरवर यावे, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस स्टेशनमध्ये नाही. आम्ही सकाळी 10 वाजता आमच्या शांततापूर्ण आंदोलनाला सुरुवात करू.

नेमकी मागणी काय?

नीट पेपर फुटीबाबत शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या आंदोलनात जेनजी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याची शक्यता लक्षात घेत जंतर-मंतर मैदानावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT