

CJP latest updates : सोशल मीडियात लोकप्रिय ठरलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचा धसका घेतला की काय, हे दाखविणाऱ्या दोन घटना आज घडल्या आहेत. पार्टीने येत्या ६ जून रोजी दिल्लीत जंतरमंतर याठिकाणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाची घोषणा केली आहे. पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपकेही याचदिवशी भारतात परतणार आहेत. यापार्श्वभूमीवर या दोन घटना चर्चेत आल्या आहेत.
दिल्लीत होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही किंवा कोणत्या घटनेचा संदर्भही दिलेला नाही. मात्र, पोस्टमधील आशय हा कॉक्रोच जनता पार्टीने जाहीर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असल्याची चर्चा आहे.
काय म्हणाले रिजिजू?
किरेन रिजिजू यांनी मध्यरात्री केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मी भारतात राहत असल्याचा मला अभिमान आहे, पण केवळ पैशामागे धावणाऱ्या, नैतिक मूल्यांचा अभाव असलेल्या आणि दहशतवादी, माओवादी, भारतविरोधी गट तसेच गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या स्वार्थी लोकांची मला लाज वाटते.
मुक्त आणि खुलेपणाने होणारी चर्चा आणि कोणत्याही सेन्सॉरशिपशिवाय मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार, हे आपल्या लोकशाहीचे खरे सौंदर्य आहे. भारताच्या अखंड सार्वभौमत्वाला, अंतर्गत स्थैर्याला आणि आर्थिक प्रगतीला हानी पोहचविणाऱ्यांचे कुणीही समर्थन करू नये, असे किरेन रिजिजू म्हणाले आहेत.
महाराष्ट्र पोलिसांनी काय केलं?
पुणे जिल्ह्यातील मंचर येथे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय आंदोलन झाले. यावेळी पुणे-नाशिक महागार्ग रोखण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने कॉक्रोच मास्क घातला होता. हे लक्षात येताच बंदोबस्तावरील पोलिसांनी तातडीने या आंदोलनकर्त्याकडील मास्क ताब्यात घेतला. संबंधित आंदोलनकर्त्याने यावरून नाराजी व्यक्त केली. कॉक्रोच जनता पार्टीच्या सोशल मीडियातील लोकप्रियतेचा पोलिसांनीही धसका घेतलाय की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.