Arif Aqeel Passes Away Sarkarnama
देश

Arif Aqeel Passes Away: सहा वेळा आमदार असलेले, काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ अकील यांचे निधन

सरकारनामा ब्यूरो

Bhopal News काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आरिफ अकील यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. भोपाळ येथील एका रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आरिफ अकील हे उत्तर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. अनेक दिवसापासून ते आजारी होते.

मध्य प्रदेश सरकारमध्ये ते दोन वेळा मंत्री होते. आरिफ अकील हे 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. अल्पसंख्यांक कल्याण, कारागृह आणि खाद्य विभागाची त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

प्रकृती बरी नसल्याने 2023 मध्ये भोपाळ उत्तर विधानसभा मतदारसंघातूनन त्यांचे पुत्र आतिफ अकील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. ते सध्या आमदार आहेत.

1984 मध्ये भोपाळ मध्ये झालेल्या गॅस दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसाठी त्यांनी नवीन वसाहत उभारती होती. त्यांच्यासाठी त्यांनी लढा दिला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT